विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:41 AM2018-07-24T00:41:54+5:302018-07-24T06:48:26+5:30
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार
पुणे : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़ विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला़ कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
झारखंड व लगतच्या क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्यामुळे झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान व लगतच्या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे.
सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत कोकण, गोव्यातील मुल्दे ७०, कुडाळ, मंडणगड, राजापूर, सांगली, सावंतवाडी ५०, भिरा, जव्हार, कणकवली, म्हापसा, वाल्पोई ४०, महाड, मडगाव, माथेरान, फोंडा, केपे, संगमेश्वर, देवरुख, वैभववाडी ३० मिमी पावसाची नोंद झाली़ याशिवाय बहुतांश भागात हलका पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील इगतपुरी ८०, महाबळेश्वर ७०, लोणावळा, राधानगरी ५०, चंदगड ४०, मुल्हेर, पौड मुळशी, सुरगणा ३ मिमी पाऊस झाला.
मराठवाड्यात भोकरदन, किनवट, परळी वैजनाथ २०, चाकूर, देवणीकळंब, माहूर, मांजलगाव, रेणापूर, शिरुर, अनंतपाल, सिल्लोड, वार्शी १० मिमी पाऊस पडला. विदर्भात गोरेगाव, सडक अर्जुनी ६०, गोंदिया, कोरची, लाखांदूर, नागपूर, तिरोरा, तुमसर ५०, आमगाव, अर्जुनी मोरगाव, देवरी, हिंगणा, कुरखेडा, पौनी, साकोली, सालेकसा ४० मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय बहुतांश ठिकाणी हलका पाऊस झाला होता.