आई, पत्नीसह दोन मुलींचा निर्घृण खून

By admin | Published: September 11, 2016 03:46 AM2016-09-11T03:46:00+5:302016-09-11T03:46:00+5:30

शेतजमिनीच्या वादातून अटक वॉरंट निघाल्याने फरारी भारत कुंडलिक इरकर (४५) याने धारदार हत्याराने वार करून आई, पत्नीसह दोन मुलींची अत्यंत क्रूरपणे हत्या केली

Mother and wife, bloodless murder of two girls | आई, पत्नीसह दोन मुलींचा निर्घृण खून

आई, पत्नीसह दोन मुलींचा निर्घृण खून

Next

डफळापूर (जि.सांगली) : शेतजमिनीच्या वादातून अटक वॉरंट निघाल्याने फरारी भारत कुंडलिक इरकर (४५) याने धारदार हत्याराने वार करून आई, पत्नीसह दोन मुलींची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. काळजाचा थरकाप उडविणारी ही घटना जत तालुक्यातील कुडणूर (ता. जत) येथे शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. आई सुशीला कुंडलिक इरकर (६५), पत्नी शिंदूबाई (४०), मुलगी रूपाली (१९) व राणी (१७) अशी मृतांची नावे आहेत. या हत्या केल्यानंतर आरोपी भारत हा स्वत:हून जत पोलिसांत हजर झाला.
भारत इरकरचे वडील कुंडलिक परिसरात जमीनदार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना सहा पत्नी होत्या. त्यांच्याकडील ६४ एकर जमिनीपैकी ३२ एकर जमीन त्यांनी हयात असतानाच विकली होती. त्यांच्या पश्चात उर्वरित जमिनीतील सोळा एकर भारतने विकली असून, स्वत:च्या व दोन मुलांच्या नावे प्रत्येकी आठ एकर जमीन केली आहे. मात्र, ही सर्व जमीन मिळावी, यासाठी भारतची सावत्र आई जनाबाई इरकर (सध्या रा. सांगली) यांनी न्यायालयात धाव घेतली. हा वाद उच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. भारत तारखेला हजर न राहिल्यामुळे त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले होते. गेले सहा महिने तो फरार होता. दरम्यानच्या काळात जनाबाई यांच्या बाजूने वादाचा निकाल लागला होता. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला होता. जमीन मोजणीही झाली होती.
या वादात फरार असलेला भारत शुक्रवारी रात्री घरी आला. या वेळी दोन मुले म्हाळाप्पा (१४) व आकाश (१२) आत्याकडे अभ्यास करण्यास गेली होती. त्यानंतर, ती तेथेच जेवण करून झोपली. पहाटे साडेपाचच्या सुमारास भारतची आई सुशीला व पत्नी शिंदूबाई दोन मुलींसह शेतात तण काढण्यासाठी गेल्या. त्या वेळी भारतने त्यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. डोक्यावर वर्मी घाव बसल्याने चौघीही जागीच ठार झाल्या. त्यानंतर, भारत तेथून निघून गेला.
दरम्यान, भारतची दोन मुले सकाळी शाळेला जाण्यासाठी घरी आली. यावेळी घरात कोणीच नव्हते. ते दोघे दफ्तर घेऊन शिंगणापूर येथील शाळेला जाण्यासाठी शेतातून जात असताना त्यांना चार मृतदेह दिसले. हा प्रकार पाहून त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर, तेथे आलेल्या ग्रामस्थांनी जत पोलिसांना कळविले.

घरची परिस्थिती बेताची असल्याने सुशीला चिकू विकून नातवंडांचे शिक्षण पूर्ण करीत होत्या. भारतची मुलगी रूपाली कवठेमहांकाळ येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. तिला बारावीमध्ये ७१ टक्के गुण मिळाले होते. तिच्या विवाहाचीही तयारी सुरू होती. डफळापुरातील डफळे हायस्कूलमध्ये रूपाली व कुटुंबाला श्रद्धांजली वाहण्यात आली.

माळकरी भारत : भारत हा विठ्ठलाचा भक्त, माळकरी होता. वारकरी संप्रदायातील असल्याने तो नेहमी पंढरपूरला दर्शनासाठी जात असे. भक्तिमार्गातील भारतकडून असे कृत्य घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जमीन ताब्यातून गेल्यानंतर कुटुंबाचे कसे होणार, या विवंचनेतून त्याने कुटुंबाला संपविण्याचा विचार केल्याची चर्चा घटनास्थळी होती.

Web Title: Mother and wife, bloodless murder of two girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.