मातृत्वाची प्रचिती...
By admin | Published: July 23, 2014 01:02 AM2014-07-23T01:02:00+5:302014-07-23T01:02:00+5:30
‘आई’ हा शब्दच अमूर्त वात्सल्य, अनन्यसाधारण त्याग आणि पराकोटीच्या ममत्वाची अनुभूती देणारा शब्द आहे. मनुष्यप्राणी भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचा चपखल वापर करू शकतात.
Next
‘आई’ हा शब्दच अमूर्त वात्सल्य, अनन्यसाधारण त्याग आणि पराकोटीच्या ममत्वाची अनुभूती देणारा शब्द आहे. मनुष्यप्राणी भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचा चपखल वापर करू शकतात. पण, मूक प्राण्यांना मात्र केवळ कृती आणि हावभावांमधूनच सर्व भावनांचे प्रकटीकरण करावे लागते. मुुसळधार पावसापासून आपल्या पिलांचा बचाव करण्यासाठी चिखलदऱ्यात बेंचखाली जीव मुठीत धरून बसलेली ही माकडे पाहून त्यांच्यातील ममत्व भावनेची प्रचिती येते. मनुष्याप्रमाणेच त्यांनाही त्यांच्या चिलापिलांची काळजी आहे.