‘मदर स्कूल’ रोखणार ‘माध्यमिक’ची गळती!
By Admin | Published: November 7, 2016 06:05 AM2016-11-07T06:05:28+5:302016-11-07T06:05:28+5:30
प्राथमिक शाळेतील गळती रोखण्यासाठी शिक्षण विभागाने काढलेला ‘सेल्फी’चा आदेश वादग्रस्त ठरत असताना आता माध्यमिक शाळांमध्ये गळती रोखण्याची जबाबदारी ‘मदर स्कूल’वर टाकण्यात आली आहे.
धुळे : प्राथमिक शाळेतील गळती रोखण्यासाठी शिक्षण विभागाने काढलेला ‘सेल्फी’चा आदेश वादग्रस्त ठरत असताना आता माध्यमिक शाळांमध्ये गळती रोखण्याची जबाबदारी ‘मदर स्कूल’वर टाकण्यात आली आहे.
माध्यमिक स्तरांवरील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण विभागाप्रमाणे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये गुणवत्ता वाढ व विद्यार्थ्यांची गळती रोखण्यावर भर देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात सर्वाधिक मुले असलेल्या शाळांना यापुढे ‘मदर स्कूल’ संबोधण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून काही मुले माध्यमिक शाळेत जात नसल्यास त्यांना शोधून पटावर आणण्याची जबाबदारी ‘मदर स्कूल’वर टाकण्यात आलेली आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक गावासाठी ‘मदर स्कूल’ निश्चित कराव्यात. त्या शाळांच्या माध्यमातून इयत्ता आठवी पास सर्व विद्यार्थी इयत्ता नववीत दाखल होतील, याची खात्री करावी. १०० टक्के मुलांच्या प्रवेशाची शहानिशा करण्यासाठी ‘सरल’ संगणक प्रणालीचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या मूल्यांकनात राज्याला प्रथम तीन क्रमांकात आणण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले आहे.
भाषा, गणितावर भर
कार्यक्रमाच्या सुरुवातीची दोन वर्षे फक्त भाषा व गणितातील क्षमता वाढविण्यासाठी देण्यात येणार आहे. नववीची १०० टक्के मुले दहावीत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे शाळांकडून नववीत मुलांना मुद्दाम नापास करण्याला चाप बसणार आहे.
विद्यार्थी व शिक्षकांच्या हजेरीसाठी प्रत्येक शाळेच्या
पातळीवर बायोमेट्रिकची बोगस उपस्थिती नोंदवण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे.
विद्यार्थ्यांची
इंग्रजी विषयाची भीती दूर व्हावी म्हणून स्पोकन इंग्लिशवर भर
देण्यात येणार आहे. त्यात श्रवण, लेखन व संभाषण कौशल्याचा
समावेश असेल. माध्यमिक
शाळाही लोकसहभागातून
डिजिटल व ई-लर्निंग करण्यावर
भर असेल. (प्रतिनिधी)