मुलीचे तीन वेळा लग्न मोडल्याने आईची आत्महत्या

By admin | Published: February 7, 2017 04:47 AM2017-02-07T04:47:15+5:302017-02-07T04:47:15+5:30

एकतर्फी प्रेमप्रकरणातून मुलीची छेड काढून तिचे ठरलेले लग्न मोडल्याने हताश झालेल्या आईने विष प्राशन करून आत्महत्या केली.

Mother's suicide due to daughter's failure to break into marriage three times | मुलीचे तीन वेळा लग्न मोडल्याने आईची आत्महत्या

मुलीचे तीन वेळा लग्न मोडल्याने आईची आत्महत्या

Next

सांगली : एकतर्फी प्रेमप्रकरणातून मुलीची छेड काढून तिचे ठरलेले लग्न मोडल्याने हताश झालेल्या आईने विष प्राशन करून आत्महत्या केली. पलूस तालुक्यातील खटाव येथे सोमवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. शोभा सुरेश नागावे-पाटील (वय ४५) असे तिचे नाव आहे. मुलीची तिच्या भावी सासरच्या मंडळींना बदनामीकारक माहिती देऊन या तरुणाने तब्बल तीनवेळा लग्न मोडल्याचे उघड झाले आहे.
शोभा नागावे-पाटील यांच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्या मुलगा व मुलीसोबत खटावमध्ये राहत होत्या. मुलीला शिक्षणासाठी त्यांनी ऐतवडे-खुर्द येथे भावाकडे पाठविले होते. याच गावातील एक तरुण दोन वर्षापासून एकतर्फी प्रेमप्रकरणातून मुलीची छेड काढत होता. मुलीने हा प्रकार आई व मामाला सांगितला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Mother's suicide due to daughter's failure to break into marriage three times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.