मुलाची हत्या करून आईची आत्महत्या

By admin | Published: March 15, 2017 03:49 AM2017-03-15T03:49:57+5:302017-03-15T03:49:57+5:30

अवघ्या पाच वर्षांच्या पोटच्या गोळ्याची क्रूरपणे गळा दाबून हत्या केल्यानंतर मातेने स्वत:सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली.

Mother's suicide by killing a child | मुलाची हत्या करून आईची आत्महत्या

मुलाची हत्या करून आईची आत्महत्या

Next

मोर्शी (अमरावती) : अवघ्या पाच वर्षांच्या पोटच्या गोळ्याची क्रूरपणे गळा दाबून हत्या केल्यानंतर मातेने स्वत:सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास येथे घडली.
जयश्री दिनेश भांबुरकर (४०) असे महिलेचे नाव असून मुलाचे नाव वेदांत आहे. शांतीनिकेतन विद्यालयाजवळ दिनेश भांबुरकर यांचे घर आहे. ते पार्डी येथील गोपालकृष्ण विद्यालयात शिक्षक आहेत. मंगळवारी सकाळी ते कामानिमित्त अमरावतीला गेले होते. त्यांच्या दोन्ही मुलीदेखील शाळेत गेल्या होत्या. वेदांत नजीकच्याच शांतीनिकेतन विद्यालयात के.जी.२ चा विद्यार्थी होता. तोे शाळेतून घरी परतल्यानंतर आई जयश्रीने त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिने स्वत:देखील गळफास घेतला. घटनेचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मोर्शी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mother's suicide by killing a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.