मुस्लिमांची प्रेरणास्थानेही ‘स्वातंत्र्यसैनिक’ यादीत हवीत
By admin | Published: February 28, 2016 02:06 AM2016-02-28T02:06:02+5:302016-02-28T02:06:02+5:30
राज्य सरकारच्या स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्रवादी नेते यांच्या जन्मतिथीच्या यादीत मुस्लीम स्वातंत्र्यसैनिकांची नावेच गायब आहेत. त्यामुळे यंदाची यादी रद्द करून नव्या यादीत
मुंबई : राज्य सरकारच्या स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्रवादी नेते यांच्या जन्मतिथीच्या यादीत मुस्लीम स्वातंत्र्यसैनिकांची नावेच गायब आहेत. त्यामुळे यंदाची यादी रद्द करून नव्या यादीत मुस्लिमांसाठी प्रेरणास्थान असलेल्या व्यक्तींचाही स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात शुक्रवारी दाखल करण्यात आली आहे. स्वातंत्र्यसैनिकांची यादी तयार करताना सामान्य प्रशासन विभागाने कोणते निकष लावले, असा प्रश्नही या याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. तसेच मुस्लीम स्वातंत्र्यसैनिकांची भलीमोठी यादी जोडत राज्य सरकारची यादी रद्द करण्यात यावी, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे केली आहे. ‘जुनी यादी रद्द करून नवीन यादी जाहीर करण्यात यावी. यामध्ये मुस्लीम स्वातंत्र्यसैनिकांचाही समावेश असावा. भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांचेही नाव नव्या यादीत नमूद करावे,’ अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)