खेड घाटात मोटार-टेम्पोची धडक

By Admin | Published: April 19, 2016 01:18 AM2016-04-19T01:18:30+5:302016-04-19T01:18:30+5:30

खेड घाटात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मोटार आणि टेम्पो यांची धडक होऊन झालेल्या अपघातात चालकासह ९ जण जखमी झाले

Motor-tempo strikes in Khed Ghat | खेड घाटात मोटार-टेम्पोची धडक

खेड घाटात मोटार-टेम्पोची धडक

googlenewsNext

राजगुरुनगर : खेड घाटात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मोटार आणि टेम्पो यांची धडक होऊन झालेल्या अपघातात चालकासह ९ जण जखमी झाले. या अपघातामुळे घाटात सुमारे ३ तास वाहतूककोंडी झाली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मंचरकडून पुण्याकडे जाणाऱ्या टेम्पोला (एमएच १४-डीएम ४६७६) पुण्याकडून मंचरकडे जाणारी मोटार (एमएच १४-डीएक्स ७३६३) खेड घाटात समोरासमोर धडकली. टेम्पो उताराच्या बाजूला येत असल्याने मोटारीतील सर्व ९ जण जखमी झाले. यात मोटारीचे नुकसान झाले.
सर्व जखमी गणोरे (ता. अकोले, जि. अहमदनगर) येथील रहिवासी आहेत. घटनेनंतर टेम्पोचालक फरार झाला आहे. जखमींना उपचारांसाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारत कारभारी मोरे (वय ४५), बाळासाहेब नथू पानसरे (वय ५६), शिवाजी रामचंद्र मोरे (वय ५५), शोभा बाळासाहेब पानसरे (वय ४५)
योगेश कानवडे (वय ४०), सुनीता भारत मोरे (वय ४५), सुलभा भूपेश मोरे (वय ४०), सुरेखा शिवाजी मोरे
(वय ४०) आणि सोमनाथ पांडुरंग कानवडे (वय ३०) अशी जखमींची नावे आहेत.
सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. हा अपघात झाल्यामुळे खेड घाटात सुमारे तीन तास वाहतूककोंडी झाली.
>अपघात झालेल्या गाड्या घाटातून बाजूला करण्यास विलंब झाल्याने वाहतूककोंडीत भर पडली; त्यामुळे अतिशय संथपणे घाटात वाहतूक सुरू राहिली. अनेक जण अर्धा तास या कोंडीत अडकून पडले. अपघात खेड घाटात झाला असला, तरी जखमींना मंचर येथे हलविण्यात आल्याने उशिरापर्यंत पोलीस दफ्तरी त्याची नोंद झाली नव्हती.

Web Title: Motor-tempo strikes in Khed Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.