मोरबेत दोन महिने पुरेल इतका साठा

By Admin | Published: June 10, 2016 02:46 AM2016-06-10T02:46:08+5:302016-06-10T02:46:08+5:30

महानगरपालिकेच्या हक्काचे धरण असलेल्या मोरबे धरणात १० आॅगस्टपर्यंत पुरेल इतका साठा आहे.

Mourbet stock enough for two months | मोरबेत दोन महिने पुरेल इतका साठा

मोरबेत दोन महिने पुरेल इतका साठा

googlenewsNext


नवी मुंबई : महानगरपालिकेच्या हक्काचे धरण असलेल्या मोरबे धरणात १० आॅगस्टपर्यंत पुरेल इतका साठा आहे. गुरुवारी आयोजित पाहणी दौऱ्यामध्ये मोरबे धरणाचे कार्यकारी अभियंता जयवंत मिस्त्री यांनी माहिती दिली. महानगरपालिकेचे सभापती शिवराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोरबे धरणाची जलपातळी ६४.७ मीटर इतकी असल्याची माहिती अभियंत्यांनी दिली.
मोरबे धरणाची सद्यस्थिती पाहता ७० दिवस पुरेल इतके पाणी उपलब्ध आहे. या धरणाची खोली ८८ मीटर इतकी असून ५५ मीटरपर्यंत पाण्याचा वापर करता येतो. यंदा चांगला पाऊस झाल्यास नवी मुंबईकरांची पाणीकपातीची समस्या सुटणार आहे. यावेळी धरण परिसराची पाहणी करून नवी मुंबईकरांना अजून किती दिवस पुरेल इतके पाणी आहे याचाही अभ्यास याठिकाणी करण्यात आला. मागील वर्षी पाऊस कमी पडल्याने नागरिकांना पाण्यासंबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
पाहणी दौऱ्यादरम्यान उपस्थितांना तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती अभियंत्यांनी दिली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना पक्षप्रतोद द्वारकानाथ भोईर, शिवसेनेच्या नगरसेविका भारती कोळी, काँग्रेसच्या नगरसेविका मीरा पाटील, नगरसेवक एम.के.मढवी, नगरसेवक दीपक पवार आदी उपस्थित होते.
>भोकरपाडा जलशुध्दीकरण प्रकल्पालाही दिली भेट
नवी मुंबई महानगरपालिकेच्या भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रालाही अचानक भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. जलशुध्दीकरणाकरिता वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेचे कामकाज कसे चालते, पाण्याला शुध्द करण्यासाठी वेगवेगळ््या यंत्रणेच्या माध्यमातून जावे लागते याची सर्व माहिती या केंद्रातील अभियंत्यांनी दिली.
मोरबे धरणाचे पाणी संपेल की काय याबाबत लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे या मोरबे धरण पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईकरांना चोवीस तास पाण्याची गरज नसून नेत्यांनी राजकारण करून २४ तास पाण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेला असे राजकारण करायचे नसून नागरिकांची गरज ओळखून त्यांना आवश्यक त्या सोयी - सुविधा उपलब्ध करण्याचा ध्यास आहे.
- शिवराम पाटील,
सभापती, स्थायी समिती

Web Title: Mourbet stock enough for two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.