...मोरयाचा गजर पावसासंगे! मंगळवारपर्यंत राज्यभरात सर्वदूर पावसाचा जोर, हवामान खात्याचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 01:48 AM2017-08-27T01:48:40+5:302017-08-27T01:49:12+5:30
वरुणराजाचे बोट धरून आलेल्या मंगलमूर्ती श्रीगणेशाच्या आगमनाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. राज्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील विष्णुपुरी, कोल्हापूरातील राधानगरी यांसह पुणे जिल्ह्यातील १० धरणे भरुन वाहू लागली आहेत.
मुंबई/पुणे : वरुणराजाचे बोट धरून आलेल्या मंगलमूर्ती श्रीगणेशाच्या आगमनाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. राज्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील विष्णुपुरी, कोल्हापूरातील राधानगरी यांसह पुणे जिल्ह्यातील १० धरणे भरुन वाहू लागली आहेत. आता...इथूनपुढचे तीन दिवस म्हणजेच मंगळवारपर्यंत राज्यभरात सर्वदूर पावसाचा जोर राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
नांदेड शहरासह मराठवाड्याच्या इतर भागांची तहान भागविणारा विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण प्रकल्प आठवडाभरात दुसºयांदा भरला आहे़ नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी १२ तालुक्यांत २१ आॅगस्टच्या पहाटे अतिवृष्टी झाली होती़ कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, तुळशी धरण शंभर टक्के भरले असून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणांत ८६ टक्के एवढा साठा झाला आहे.
हवामान खात्याचा इशारा
२७ आॅगस्ट : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
२८ आॅगस्ट : कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार व तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार
२९ आॅगस्ट : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई शहरात शनिवारी विविध भागांमध्ये पावसाच्या सरींनी हजेरी लावली. पश्चिम उपनगरात ३ ठिकाणी इमारतीचा अथवा भिंतीची काही भाग पडल्याच्या तक्रारींची नोंद झाली आहे. पाऊस पडत असताना ९ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात २ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्यी.