तोंडात बोळा कोंबून ‘नकोशी’चा घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2016 08:28 PM2016-08-01T20:28:59+5:302016-08-01T20:28:59+5:30

सिडको येथे महिनाभरापूर्वी बेवारस मृतावस्थेत आढळलेल्या अर्भकाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. नकोशी असलेल्या पोटच्या मुलीचा तिच्या निर्दयी मातेने

In the mouth, the victim took the 'unwanted' victim | तोंडात बोळा कोंबून ‘नकोशी’चा घेतला बळी

तोंडात बोळा कोंबून ‘नकोशी’चा घेतला बळी

googlenewsNext
dir="ltr">
तपास पथकाला लाखाचे बक्षीस : बेवारस सापडलेल्या मृत अर्भकाच्या मातेचा शोध घेण्यात पोलीस यशस्वी
 
औरंगाबाद, दि.१ -  सिडको येथे महिनाभरापूर्वी बेवारस मृतावस्थेत आढळलेल्या अर्भकाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. नकोशी असलेल्या पोटच्या मुलीचा तिच्या निर्दयी मातेने तोंडात बोळा कोंबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्या मातेसह तिची प्रसूती करणाºया दाईला अटक केली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद पोलिसांच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे बेवारस अवस्थेत आढळलेल्या अर्भकाच्या मातेचा शोध घेण्यात सिडको पोलिसांना यश आले. तपास करणाºया तरबेज पोलीस अधिकारी- कर्मचाºयांना आयुक्तांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले तर पोलिसांना मदत करणाºया खबºयाला पन्नास हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
अर्भकाची आई बिस्मिल्लाबी वसीम खान (रा. मिसारवाडी, सिडको) आणि दाई शारजा शेख नबी (रा. हर्सूल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे आहेत. याविषयी पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, सिडकोतील सनी सेंटरच्या मागे २१ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास स्त्री जातीचे एक नवजात अर्भक बेवारस अवस्थेत आढळले होते. शवविच्छेदनामध्ये अर्भकाच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबून खून करण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणी सिडको ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी सुरू केला. त्यासाठी शहरातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या डॉक्टरांची बैठक घेऊन २० ते २१ जून रोजी त्यांच्या रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलांची यादी मागविली होती. तसेच शहरातील सर्व सोनोग्राफी सेंटर्स चालकांची बैठक घेऊन जून महिन्यात संभाव्य प्रसूत होणाºया गर्भवती महिलांची नावे आणि पत्ते मिळविले होते.
 त्यानंतर पोलिसांनी शहरातील सर्व नगरसेवक आणि विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या तपासासाठी मदत करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले होते. त्यानंतर शहरातील विविध कॉलन्यांमध्ये पत्रके वाटून अशा महिलेची माहिती देणाºयास पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर एका लोकप्रतिनिधीने मिसारवाडी येथे राहणारी बिस्मिल्लाबी ही गर्भवती होती आणि तिच्याकडे आता बाळ नसल्याची माहिती पोलिसांना कळविली. त्याआधारे सोमवारी पहाटे पोलिसांनी बिस्मिल्लाबी हीस ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
बिस्मिल्लाबीचा पती अडीच वर्षांपासून हर्सूल कारागृहात आहे. तिला पाच वर्षांचा मुलगा आणि अडीच वर्षाची मुलगी आहे. पती कारागृहात असताना अनैतिक संबंधातून तिला गर्भधारणा झाली. त्यामुळे तिला हे बाळ नको होते. २१ जून रोजी पहाटे शारजाबी या दाईने तिची गुपचूप प्रसूती केली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. या ‘नकोशी’च्या तोंडात कापसाचा बोंळा कोंबून तिने तिचा खून केला. त्यानंतर दुपारी बिस्मिल्लाबीने हे अर्भक सनी सेंटरच्या मोकळ्या मैदानात फेकून दिले. चार वाजेच्या सुमारास नागरिकांना हे अर्भक आढळले. पोलिसांनी प्रथम बिस्मिल्लाबीला पकडल्यानंतर शारजालाही अटक केल्याचे आयुक्तांनी सांगितले. 
दीड वर्षात आढळलेल्या १५ बेवारस अर्भकांच्या मातेचाही शोध सुरू
शहरात बेवारस अवस्थेत अर्भक आढळण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. गतवर्षी २०१५ मध्ये शहरात ८ तर यावर्षी जुलैअखेरपर्यंत ७ अर्भके बेवारस अवस्थेत आढळली होती. या १५ अर्भकांबाबत नव्याने तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय या प्रकरणाचा केस स्टडी म्हणून सर्व अधिकाºयांनी अभ्यास करून तपास करावा, अशा सूचना देण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.
 
डीएनए चाचणीनंतरच कळणार त्याचे वडील कोण?
मृत अर्भकाचा बाप कोण आहे, हे डीएनए चाचणीद्वारे ठरविण्यासाठी पोलिसांनी मृताच्या रक्ताचे नमुने घेतले होते. तिच्या माता आणि संशयित वडिलांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. या डीएनए चाचणीनंतरच त्याचे वडील कोण आहेत, हे निश्चित होईल. 
 
अर्भकाच्या मातेपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना प्रथमच यश...
अर्भकाचा खून करून प्रेत बेवारस अवस्थेत फेकण्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. मात्र, अशा गुन्ह्यातील मातेचा शोध घेण्यात पोलिसांना प्रथमच यश आले. त्यासाठी आयुक्तांनी स्वत: पुढाकार घेतला. पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती, ज्ञानोबा मुंढे, पोलीस  निरीक्षक कैलास प्रजापती, स.पो.नि. अर्चना पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार पाडळे, पोलीस उपनिरीक्षक बी. एस. कोते यांनी हा तपास पूर्ण केला. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आणि एक लाखाचे बक्षीस देण्याची घोषणा आयुक्तांनी केली.

Web Title: In the mouth, the victim took the 'unwanted' victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.