‘त्या’ जुळ्यांना मुंबईला हालविले
By admin | Published: June 20, 2016 04:16 AM2016-06-20T04:16:11+5:302016-06-20T04:16:11+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात एका महिलेने जुळ्या मुलांना शनिवारी जन्म दिला़ या मुलांचे हृदय आणि यकृत एक असून, छाती व पोट एकमेकांना चिकटलेले आहे़
लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात एका महिलेने जुळ्या मुलांना शनिवारी जन्म दिला़ या मुलांचे हृदय आणि यकृत एक असून, छाती व पोट एकमेकांना चिकटलेले आहे़ पुढील शस्त्रक्रियेसाठी त्यांना मुंबईला हलविण्यात आले आहे़
सर्वोपचार रुग्णालयात तसलीम मासुलदार यांनी या जुळ्यांना जन्म दिला आहे़ आईची प्रकृती स्थिर आहे़ सायन रुग्णालयात या जुळ्यांवर पुढील शस्त्रक्रिया करणार असल्याने रुग्णवाहिकेतून या जुळ््यांसह दोन बालरोगतज्ज्ञ, दोन ब्रदर व एक सहाय्यक हे रविवारी मुंबईकडे रवाना झाले आहेत़ (प्रतिनिधी)
गुंतागुंतीची शस्त्रक्रिया़़़
अशा शस्त्रक्रिया मुंबईच्या सायन व केईएम रुग्णालयात होऊ शकतात़ त्यासाठी या जुळ्यांना मुंबईला पाठविण्यात आले. या दोघांमध्ये एकच हृदय आणि यकृत असल्याने एक जण जिवंत राहण्याची शक्यता असल्याचे डॉ़ रवी रेड्डी यांनी सांगितले़