रोहितच्या समर्थनार्थ राज्यभरात आंदोलन
By admin | Published: January 31, 2016 02:56 AM2016-01-31T02:56:58+5:302016-01-31T02:56:58+5:30
हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय)
मुंबई : हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र समितीमार्फत १७ फेब्रुवारीपर्यंत राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. जस्टीस फॉर रोहित संयुक्त कृती समितीच्या वतीने १ फेब्रुवारीला राणीबाग ते विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार असून या आंदोलनाला एसएफआयने पाठिंबा दिला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ देशातील विविध भागात आंदोलन करीत असलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी हल्ले केले आहेत. विद्यार्थ्यांना आणि रोहित वेमुलाच्या कुटुंबियांना न्याय देणाचे सोडून सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे. या संदर्भात एसएफआय दोन आठवड्यांपासून देशभर प्रचार कार्यक्रम राबवित आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पाठिंब्याने देशभरातील विद्यापीठे विद्यार्थ्यांना देत असलेल्या
अमानुष आणि अन्यायी वागणुकीविरोधात हे आंदोलन छेडण्यात येत असल्याचे, एफएसआयने कळविले आहे.
जस्टीस फॉर रोहित संयुक्त कृती समितीच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता भायखळा राणीबाग ते विधानसभेपर्यंत प्रतिकार मोर्चा काढण्यात येणार आहे. रोहितच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत त्वरित अटक करावी, पी.अप्पा राव यांना कुलगुरु पदावरुन तत्काळ अटक करण्यात यावी, यासह विविध आठ मागण्यांसाठी हा मार्च काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)