मुख्यमंत्र्यांच्या काकूंचे टोलविरोधात आंदोलन

By admin | Published: January 22, 2015 01:31 AM2015-01-22T01:31:55+5:302015-01-22T01:31:55+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू व भाजपाच्या विधान परिषद सदस्य शोभाताई फडणवीस बुधवारी टोलवसुली विरोधात रस्त्यावर उतरल्या.

Movement against Chief Minister's towel's toll | मुख्यमंत्र्यांच्या काकूंचे टोलविरोधात आंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या काकूंचे टोलविरोधात आंदोलन

Next

रामटेक/बोरखेडी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू व भाजपाच्या विधान परिषद सदस्य शोभाताई फडणवीस बुधवारी टोलवसुली विरोधात रस्त्यावर उतरल्या. नागपूर जिल्ह्यातील मनसर व बोरखेडी टोलनाके बंद करण्यासाठी त्यांनी आंदोलन केले.
रास्ता रोकोमुळे नागपूर-हैदराबाद आणि नागपूर-जबलपूर महामार्गावरील वाहतूक काही तासांसाठी विस्कळीत झाली. राज्यात सत्ता आल्यानंतर टोलनाके बंद करण्याची घोषणा भाजपाने केली होती.
मात्र राज्य सरकारने आश्वासनाची अंमलबजावणी न केल्याने खुद्द मुख्यमंत्र्यांच्या काकूंनाच आंदोलन करावे लागले. रामटेकचे आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह भाजपा नेत्यांनी मात्र राजकीय दबावामुळे या आंदोलनाकडे पाठ फिरविली. (प्रतिनिधी)

 

Web Title: Movement against Chief Minister's towel's toll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.