काँग्रेसचे सरकार विरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2016 01:05 AM2016-11-04T01:05:46+5:302016-11-04T01:05:46+5:30
मोदी सरकारच्या विरोधात कॉँग्रेसतर्फे डेक्कनच्या गोपालकृष्ण गोखले चौकात आंदोलन करण्यात आले.
पुणे : माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या मोदी सरकारच्या विरोधात कॉँग्रेसतर्फे डेक्कनच्या गोपालकृष्ण गोखले चौकात आंदोलन करण्यात आले. 'मोदी सरकार हाय-हाय', 'हुकूमशाही पद्धतीने सरकार चालविणाऱ्या भाजपाचा धिक्कार असो' अशा घोषणा देण्यात आल्या.
प्रदेश काँग्रेस प्रवक्ते उल्हास पवार म्हणाले, ‘‘सरकार भावनाशून्य झालेले असून, मोदी हिटलरप्रमाणे सरकार चालवत आहेत. माजी सैनिकांच्या भावनांशी खेळण्याचे काम सरकार करीत आहे.’’
शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘मोदी सरकार सूडबुद्धीने कार्य करत आहे. ग्रेवाल यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांस सांत्वन करण्यास गेलेले काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी व इतर पक्षांच्या नेत्यांना त्यांना भेटण्यास पोलिसांनी मज्जाव केला. ते लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. सरकारने जर यापुढे अशाप्रकारचे कृत्य चालू ठेवले, तर देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करतील.’’
या वेळी प्रदेश कॉँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, उपमहापौर मुकारी अलगुडे, गोपाळ तिवारी, कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, बाळासाहेब शिवरकर, विकास लांडगे, भूषण रानभरे, अजित दरेकर, मनीष आनंद, हाजी नदाफ, सदानंद शेट्टी, नीता राजपूत, दत्ता बहिरट, अविनाश बागवे, सुनील मलके, रईस सुंडके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)