‘न्यायालयाचा निर्णय विरोधात गेल्यास आंदोलन’
By admin | Published: June 28, 2016 03:56 AM2016-06-28T03:56:50+5:302016-06-28T03:56:50+5:30
न्यायालयाचा निकाल महिलांच्या विरोधात गेल्यास रस्त्यावर उतरुन पुन्हा आंदोलन करणार असल्याचे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सोमवारी सांगितले.
सोनई (अहमदनगर) : हाजीअली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश मिळण्याबाबत न्यायालयाचा निकाल महिलांच्या विरोधात गेल्यास रस्त्यावर उतरुन पुन्हा आंदोलन करणार असल्याचे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सोमवारी सांगितले. यासाठी सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी असल्याचे त्या म्हणाल्या.
हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी भूमाता ब्रिगेडच्यावतीने उच्च न्यायालयात दाखल याचिकेचा निकाल मंगळवारी लागणार आहे. हा निकाल महिलांच्या बाजूने लागावा, यासाठी देसाई यांनी सोमवारी दुपारी चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाला साकडे घातले. त्या म्हणाल्या, न्यायालयाचा हा निकाल महिलांच्यादृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. दर्ग्यामध्ये २०११पासून महिलांना प्रवेश दिला जात नाही. मात्र, यापूर्वी दिला जाणारा हा प्रवेश बंद करणे, हे एकप्रकारे महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्यासारखे आहे. त्यामुळे शिंगणापूरच्या आंदोलनानंतर आम्ही हाजी अली दर्ग्याचा विषय हाती घेतला, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)