दलित अत्याचाराविरोधात वानखेडेबाहेर आंदोलन
By admin | Published: November 1, 2014 01:38 AM2014-11-01T01:38:12+5:302014-11-01T01:38:12+5:30
राज्यातील दलित अत्याचाराच्या घटनांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील विविध पुरोगामी संघटनांनी शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी आंदोलन केले.
Next
मुंबई : राज्यातील दलित अत्याचाराच्या घटनांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील विविध पुरोगामी संघटनांनी शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी आंदोलन केले. पोलिसांनी सुमारे 3क्क् आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना रात्री उशिरार्पयत पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवत आंदोलन चिरडून टाकले.
चर्चगेट येथील वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ होत असताना दलित अत्याचारांच्या घटनांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध संघटनांनी आंदोलन केले.
वानखेडे स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शेकडो आंदोलकांनी सनदशीर मार्गाने आंदोलन केले. या वेळी प्रचंड पोलीस बंदोबस्ताला छेद देऊन कार्यकत्र्यानी सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.
या आंदोलनातील साहित्यिक उर्मिला पवार, उषा अम्बोरे, आनंदराज आंबेडकर, राज असरोंडकर, सुमेध जाधव, सुधीर ढवले, सुबोध मोरे, संजय रणदिवे, फिरोज मीठीबोरवाला, अॅड. संघराज रूपवते यांच्यासह शेकडो कार्यकत्र्याना पोलिसांनी
अटक केली.
काही आंदोलकांना यलो गेट तर काहींना मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. रात्री उशिरा आंदोलकांची सुटका करण्यात
आली.
या आंदोलनामध्ये फेसबुक आंबेडकर राईट मुव्हमेंट, संभाजी ब्रिगेड, कबीर कला मंच, रिपब्लिकन सेना, कायद्याने वागा, दलित अत्याचार विरोधी कृती समिती, आंबेडकर सेंटर फॉर जस्टिस एंड पीस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनीअर, नॅशनल फेडरेशन ऑफ पेट्रोलियम, एस.सी. एस. टी. एम्पॉईज असोसिएशन आदी संघटनांनी सहभाग
घेतला. (प्रतिनिधी)