गडचिरोलीत विदर्भवाद्यांचे मनसेविरोधात आंदोलन
By admin | Published: September 15, 2016 02:36 PM2016-09-15T14:36:21+5:302016-09-15T14:36:21+5:30
विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा वडसा तालुक्याच्या वतीने मनसेचा झेंडा जाळून निषेध करण्यात आला
Next
>ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. 15 - विदर्भ राज्य आंदोलन समितीने प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत गोंधळ घातला होता. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा वडसा तालुक्याच्या वतीने मनसेचा झेंडा जाळून निषेध करण्यात आला.
स्वतंत्र विदभार्साठी येत्या ३ व ४ ऑक्टोबरला प्रति विधानसभेचे आयोजन करणाऱ्या नागपूरच्या विदर्भ राज्य आंदोलन समितीने पत्रकार परिषदेचे आयोजन मुंबई येथे १३ सप्टेंबरला केले होते. त्या पत्रकार परिषदेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या व गोंधळ घालून काही काळासाठी पत्रकार परिषद बंद पाडली होती. त्याचे पडसाद आज बुधवारी चोप गावात पाहावयास मिळाले. विदर्भ राज्य आंदोलन समिती युवक आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष गौरव नागपूरकर कमलेश बारस्कर यांच्या नेतृत्वात चोप येथील ग्रामपंचायत चौकात काळ्या फिती लावून मनसेचा झेंडा जाळून मनसेच्या विरोधात निदर्शने देण्यात आली व निषेध नोंदविण्यात आला. यावेळी गौरव नागपूरकर म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला व पत्रपरिषद उधळून लावली. मनसे पक्ष्याच्या कार्यकर्त्यांचे सदर कृत्य हे घटनाविरोधी आहे. या कृत्याचा तिव्र निषेध व्यक्त होत आहे,असेही ते म्हणाले. यावेळी धनंजय मुंद्ले अनेक विदर्भवादी कार्यकर्ते हजर होते