हक्काच्या घरांसाठी सफाई कामगारांनी मुंबई पालिकेचे श्राद्ध घालण्याचे केले आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 07:06 AM2017-09-20T07:06:08+5:302017-09-20T07:06:10+5:30

हक्काच्या घरांसाठी सफाई कामगारांनी मुंबई पालिकेचे श्राद्ध घालण्याचे आंदोलन बुधवारी आझाद मैदानात आयोजित केले आहे. यावेळी सफाई कामगार मुंडण करून प्रशासनाचे श्राद्ध घालणार असल्याची माहिती अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद परमार यांनी दिली आहे.

The movement to cleanse the municipal corporation for cleaning houses has been done by the workers | हक्काच्या घरांसाठी सफाई कामगारांनी मुंबई पालिकेचे श्राद्ध घालण्याचे केले आंदोलन

हक्काच्या घरांसाठी सफाई कामगारांनी मुंबई पालिकेचे श्राद्ध घालण्याचे केले आंदोलन

Next

मुंबई : हक्काच्या घरांसाठी सफाई कामगारांनी मुंबई पालिकेचे श्राद्ध घालण्याचे आंदोलन बुधवारी आझाद मैदानात आयोजित केले आहे. यावेळी सफाई कामगार मुंडण करून प्रशासनाचे श्राद्ध घालणार असल्याची माहिती अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद परमार यांनी दिली आहे.
परमार म्हणाले की, सफाई कामगारांच्या संघटनांसह विविध १० संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शासन निर्णयानुसार सफाई कामगारांना मोफत हक्काची घरे मिळायला हवी होती. मात्र निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने आंदोलन करावे लागत आहे. याशिवाय लाड पागे समितीच्या नियमामध्ये सुधारणा करून संबंधित योजना पालिका विभागांतील सफाई कामगारांसाठी लागू कराव्यात, या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत.

Web Title: The movement to cleanse the municipal corporation for cleaning houses has been done by the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.