जयाजी सूर्यवंशी यांच्या घरासमोर आंदोलन

By Admin | Published: June 4, 2017 03:30 PM2017-06-04T15:30:51+5:302017-06-04T15:30:51+5:30

मुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीनंतर शेतकऱ्याचा संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करणारे किसान क्रांती चे समंवयक जयाजी सूर्यवंशी

Movement in front of Jayayaji Suryavanshi's house | जयाजी सूर्यवंशी यांच्या घरासमोर आंदोलन

जयाजी सूर्यवंशी यांच्या घरासमोर आंदोलन

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 
औरंगाबाद, दि. 4 - मुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीनंतर शेतकऱ्याचा  संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करणारे किसान क्रांती चे समंवयक जयाजी सूर्यवंशी यांच्या घरासमोर अखिल भारतीय छावा संघटना, संभाजी ब्रिगेड , मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्याननी रविवारी सकाळी धडक मारली . किसान क्रांतीच्या पदाधिकारी यांची बैठक जयाजी घरी घेउ शकतात यामुळे त्यांना गाठून जाब विचारण्यासाठी विविध  मराठा संघटनेचे पदाधिकारी बीडबायपास रोड परीसरातील जयाजीच्या घरी गेले  होते .  यावेळी जयाजी हे घरी नसल्याने पदाधिकाऱ्यानी तेथे टमाटे  , भेंडी  , कांदे फेकून निदर्शने  केली . जयाजी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली . जयाजी च्या घरावर कार्यकर्ते हल्ला करणार असल्याचे कळाल्याने पोलिसांनी घराबाहेर  बंदोबस्त लावला ..यावेळी आप्पासाहेब कुढेकर, संजय सावंत , रमेश गायकवाड , यांच्यासह मराठा संघटनेचे कार्यकर्ते  यावेळी उपस्थित होते .

Web Title: Movement in front of Jayayaji Suryavanshi's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.