एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली

By admin | Published: June 27, 2014 12:33 AM2014-06-27T00:33:17+5:302014-06-27T00:33:17+5:30

बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्यांदाच चुरशीची झाली.

Movement of one candidate | एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली

एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली

Next
>बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्यांदाच चुरशीची झाली. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये बारामती विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. महायुतीचे शिल्पकार, दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनामुळे काही प्रमाणात मनोधैर्य खचलेल्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी निवडणुकीत दोन हात करण्यासाठी कंबर कसली आहे. आता प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यावरच बारामती विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल. 
बारामती विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या वतीने अॅड. राजेंद्र काळे, अपक्ष शेतकरी कृती समितीचे नेते रंजन तावरे स्वतंत्रपणो लढले. त्यामुळे मोठय़ा फरकाने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार विजयी झाले. सर्व विरोधकांना मिळून 7क् हजार मते मिळाली होती. तर अजित पवार सव्वा लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले होते. मागील वर्षभरात बारामती तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जिरायती भागात असंतोष होता. आंदोलने झाली; मात्र लोकसभा निवडणुकीत त्याचे पडसाद उमटतील, असे चित्र होते. प्रत्यक्षात तसे जाणवले नाही. मात्र, प्रचाराचा अभाव असताना देखील महादेव जानकर यांना 52 हजार मते बारामती विधानसभा मतदारसंघातून मिळाली आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक नेत्यांनी कंबर कसली आहे. 
भाजपचे नेते बाळासाहेब गावडे, शिवसेनेचे अॅड. राजेंद्र काळे, भाजपाचे दिलीप खैरे, शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे, रंजन तावरे यांच्यापैकी एकमत करून राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा विचार सुरू आहे. 
दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकद लावली जाईल, असे सांगितले होते.  बारामतीचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सर करण्यासाठी महायुतीला मोठे दिव्य पार करावे लागणार आहे. विशेषत: पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे विरोधकांचा मुद्दा मोडीत काढण्यासाठी येत्या दोन- तीन महिन्यांत ते लक्ष देतील.  बदलत्या समीकरणात राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून पवार कुटुंबातील नवा चेहरा  रिंगणात उतरविणार असल्याची चर्चा आहे. त्यावर अद्याप पक्षपातळीवर कोणतीही चर्चा नाही, परंतु कार्यकत्र्यामध्ये आहे.  राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होईल. बसपासह 
अन्य उमेदवारही असतील. 
(प्रतिनिधी)
 
राष्ट्रवादीरमेश थोरात1,28,564
अपक्ष रंजन तावरे25, 747
शिवसेनाअॅड. राजेंद्र काळे19, 627
रासपदशरथ राऊत6, क्42

Web Title: Movement of one candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.