चळवळीचा ‘पँथर’ हरपला

By Admin | Published: May 25, 2017 02:50 AM2017-05-25T02:50:12+5:302017-05-25T02:50:12+5:30

कुटुंबापेक्षा पँथर चळवळीवर अधिक प्रेम करणारा, झोपडपट्टीतील नागरिकांच्या हक्कांसाठी लढणारा, दलित अत्याचारांच्या विरोधात आवाज उठविणारा

Movement 'Panther' Harpal | चळवळीचा ‘पँथर’ हरपला

चळवळीचा ‘पँथर’ हरपला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कुटुंबापेक्षा पँथर चळवळीवर अधिक प्रेम करणारा, झोपडपट्टीतील नागरिकांच्या हक्कांसाठी लढणारा, दलित अत्याचारांच्या विरोधात आवाज उठविणारा, सर्व राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्त्यांबरोबर सलोख्याचे संबंध असणारा, अत्यंत सयमी व शांत कार्यकर्ता म्हणून नवनाथ कांबळे यांचा नावलौकिक होता. कांबळे यांच्या अशा अचानक जाण्याने दलित चळवळीचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भावनिक झाले.
उपमहापौर नवनाथ कांबळे यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यासाठी बुधवारी बालगंर्धव रंगमंदिरात सर्व राजकीय पक्षांच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, अंकुश काकडे, आमदार माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, किरण मोघे, अविनाश बागवे, एम. डी. शेवाळे, वासुदेव गाडे, शरद रणपिसे, अभय छाजेड, परशुराम वाडेकर, महेंद्र कांबळे, महिपाल वाघमारे यांच्यासह नगरसेवक, सर्वच राजकीय पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अनेक प्रमुख नेत्यांनी कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दिलीप कांबळे म्हणाले, की राज्यात ७२मध्ये पडलेल्या दुष्काळात आम्ही दोन्ही कुटुंबे पुण्यात स्थंलातरित झालो. झोपडपट्टीत, तळागळात काम करीत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेले नवनाथ कांबळे यांना उपमहापौरपद मिळाल्यानतंर खऱ्या अर्थाने आपल्या लोकांसाठी काम करण्याची सधी मिळाली होती. आपल्या बांधवांच्या विकासासाठी अनेक योजना त्यांच्या डोक्यात होत्या. या योजना आता आपण सर्वांनी मिळून पुढे नेल्या तर त्यांना श्रद्धांजली वाहिल्यासारखे होईल. दोन महिने अनेक कार्यक्रम, बैठकांमध्ये माझा सहकारी म्हणून काम केलेला एक तरुण कार्यकर्ता आज आपल्यात नाही, याचे खूप दु:ख होते. नवनाथ कांबळे यांच्या स्मारकासाठी आवश्यक असलेली सर्व मदत महापालिकेच्या वतीने करण्यात येईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.
या वेळी सर्व आमदार, वासुदेव गाडे, किरण मोघे, काही नगरसेवक, महाविद्यालयामधील मित्र यांनी कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title: Movement 'Panther' Harpal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.