सातारकरांची चळवळ मुंबई दरबारी

By admin | Published: May 5, 2017 12:14 AM2017-05-05T00:14:56+5:302017-05-05T00:14:56+5:30

मसाप पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा : मराठीच्या अभिजात दर्जासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा

The movement of Satarkar Mumbai court | सातारकरांची चळवळ मुंबई दरबारी

सातारकरांची चळवळ मुंबई दरबारी

Next

सातारा : ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात आपण स्वत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्यक्तीश: पाठपुरावा करणार आहोत,’ अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती मसाप, सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी दिली.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी भिलार येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय ‘मसाप’ने घेतला होता.
मात्र, बुधवारी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, खंडेराव धरणे, पोलिस निरीक्षक रवींद्र पिसाळ, ‘भाजप’च्या प्रवक्त्या कांताताई नलावडे यांनी साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. पाचगणीच्या हेलिपॅडवर जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाशी भेट घडवून
दिली.
भिलार गावात आंदोलन करण्यासाठी अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, संजय माने, वजीर नदाफ, सचिन धुमाळ, सतीश घोरपडे, सुरेंद्र वारद, प्राचार्य रवींद्र येवले, शाहूपुरी, फलटण शाखेसह सातारा जिल्ह्यातील सर्व शाखांचे प्रतिनिधी अंदोलन करण्यासाठी उपस्थित होते.
मात्र, दिल्ली दरबारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आपण नक्की प्रयत्न करू असा शब्द मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा विनोद कुलकर्णी यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांचे हेलिकॅप्टर भिलार गावच्या हेलीपॅडवर आल्यानंतर वेद पठणाने त्यांचे स्वागत करण्यात आल्याचे सांगून सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माने यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)


सरपंचांच्या घरी घेतली भेट
भिलारच्या सरपंच वंदना भिलारे यांच्या निवासस्थानी जाऊन आणि काही घरांना भेटी देऊन मुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली. गुरुवारचा कार्यक्रम आगळावेगळा असल्याने साहित्यिक व रसिक मोठ्या संख्येने आले होते.


भिलारच्या औदार्याची चित्रफितीतून माहिती
या कार्यक्रमात‘पुस्तकाचं गाव भिलार’ यावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. या चित्रफितीतून भिलारवासीयांनी दाखविलेल्या औदार्याची माहिती मिळाली.
भिलार येथील सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचे भाषण संपताच एका व्यक्तीने कर्जमाफीच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी त्याला बाहेर नेले.

Web Title: The movement of Satarkar Mumbai court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.