खेडमध्येच विमानतळ उभारण्याच्या हालचाली - मुख्यमंत्र्यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2016 03:39 PM2016-10-06T15:39:27+5:302016-10-06T15:39:27+5:30

औद्योगिकरणाच्या दृष्टीकोणातून व शेतक-यांच्या हितासाठी उद्योगनगरीच्या जवळ असलेल्या खेडमध्येच विमानतळ उभारण्यात येणार आहे, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.

Movement for setting up airports in Khed - Chief Minister's signal | खेडमध्येच विमानतळ उभारण्याच्या हालचाली - मुख्यमंत्र्यांचे संकेत

खेडमध्येच विमानतळ उभारण्याच्या हालचाली - मुख्यमंत्र्यांचे संकेत

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
चाकण (पुणे), दि. ६ -  खेड तालुक्यातून प्रस्तावित विमानतळ स्थलांतराच्या निर्णयामुळे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव, चाकण, राजगुरुनगर, रांजणगाव आदी औद्योगिक पट्ट्यातील उद्योजक, तसेच स्थानिक शेतक-यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, औद्योगिकरणाच्या दृष्टीकोणातून व शेतक-यांच्या हितासाठी उद्योगनगरीच्या जवळ असलेल्या खेडमध्येच विमानतळ उभारण्यात येणार आहे, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. त्यामुळे उद्योजक, शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. पण सेझ  शेतकऱ्यांना परतावा देण्याबाबत बैठक आयोजीत करण्यात आली होती. शेतकऱ्यांना जमीनीचे चालु दरानुसार पैसे मिळावेत अशी मागणी केली यावर लवकरच मुख्यमत्र्यांची पुन्हा बैठक होणार आहे. यावेळी सेझमध्ये विमानतळ करण्यात यावे अशी आग्रही मागणी खासदार शिवाजी आढळराव पाटील व आमदार सुरेश गोरे यांनी केली.
खेड तालुक्यात होणा-या नियोजित विमानतळाचे स्थलांतर पुरंदर तालुक्यात होणार, असे निश्चित करण्यात आले होते. त्याचा फटका उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव, चाकण, रांजणगाव आदी औद्योगिक क्षेत्राला बसणार होता. याबाबत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार सुरेश गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सुभाष देसाई यांना मुंबई येथे आज बैठकीत साकडे घातले. खेड-चाकण परिसरात विमानतळ होणार म्हणून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करुन उद्योग उभारले आहेत. या औद्योगिक पट्ट्यात 15 ते 20 हजार लहान-मोठे उद्योग आहेत. त्यामध्ये मोठ्याप्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांनीही मोठे प्रकल्प उभारले आहेत. त्यामुळे येथील शेतक-यांनाही त्याचा फायदा होणार होता. उद्योग क्षेत्राच्या विकासासाच्या दृष्टीने आणि स्थानिक शेतक-यांच्या हितासाठी प्रस्तावित विमानतळाचे स्थलांतर करु नये, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले होते. यावर सकारात्मक चर्चा झाली असून, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे तांत्रिक पथक आता खेड परिसरातील राजगुरुनगर येथील क्षेत्राचा अभ्यास करणार आहे
 
आमदार सुरेश गोरे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड, खेड, चाकण, तळेगाव, आंबेगाव, जुन्नर आदी परिसरातील शेतकरी, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची बैठक घेवून विमानतळाच्या अपरिहार्यतेबाबत भूमिका जाणून घ्यावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी आमची बाजू समजून घेतली आहे. खेडमध्येच विमानतळ उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत. त्यामुळे तमाम शेतकरी, उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. यापुढेही आम्ही पाठपुरावा करणार आहोत.खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील व आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी आज उद्योगमत्री सुभाष देसाई यांची विमानतळा संर्दभात भेट घेतली तसेच शेतकऱ्यांच्या परतावा जमीनीसाठी आग्रही भूमिका घेतली.

Web Title: Movement for setting up airports in Khed - Chief Minister's signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.