वैद्यनाथाच्या पिंडीवरील चांदीचे आवरण काढण्यासाठी आंदोलन
By admin | Published: July 16, 2016 08:43 PM2016-07-16T20:43:24+5:302016-07-16T20:43:24+5:30
देवल कमिटीने पिंडीवर झाकलेले चांदीचे आवरण काढून पुन्हा स्पर्शदर्शन पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी शिवभक्तांचे अनोखे आंदोलन सुरू केले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
परळी (बीड), दि. 16 - अनादी काळापासून चालत आलेली प्रभू वैद्यनाथाच्या पिंडीची स्पर्श दर्शन परंपरा विश्वस्त मंडळाच्या चुकीच्या निर्णयांमुळे बंद पडली असून, देवल कमिटीने पिंडीवर झाकलेले चांदीचे आवरण काढून पुन्हा स्पर्शदर्शन पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी शिवभक्तांचे अनोखे आंदोलन सुरू झाले असून, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांना परळी पंचक्रोशीतील हजारो शिवभक्त पत्र पाठवत आहेत. या मोहिमेचा शुभारंभ आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर वैद्यनाथाच्या दक्षिण घाटापासून करण्यात आला.
प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकास कृती समितीच्या वतीने पिंडीवरील चांदीचे आवरण काढावे या मागणीसाठी लोकशाही मार्गाने विविध आंदोलने करण्यात येणार असून, या आंदोलनाचा शुभारंभ आषाढी एकादशीचे औचित्य साधून करण्यात आला. वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पोस्ट कार्ड देण्यात आले. हे पोस्टकार्ड महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांना शिवभक्तांच्या वतीने पिंडीवरील चांदीचे आवरण काढून पुर्वापार चालत आलेली स्पर्श दर्शनाची परंपरा सुरू करावी, ही मुख्य मागणी करण्यात येत आहे.
या कार्यक्र माच्या शुभारंभ प्रसंगी समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, कार्याध्यक्ष वसंत मुंडे, सचिव गोपाळ आंधळे, उपाध्यक्ष संजय आघाव, सहसचिव प्रा.अतुल दुबे, प्रदीप खाडे आदीं या मोहीमेत सहभागी झाले होते. या आंदोलनाचा दुसरा भाग न्यायालयीन लढाई लढण्यासाठी शनिवार दि. १६ जुलै रोजी समितीच्या सर्व पदाधिकाºयांनी सहायक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे अपील याचिका दाखल करण्यात आली.