डोंबिवली-कोपरदरम्यान झोपडपट्टीवासियांचे आंदोलन, रेल्वेसेवा ठप्प

By admin | Published: January 12, 2017 12:43 PM2017-01-12T12:43:16+5:302017-01-12T12:52:46+5:30

रेल्वे अधिका-यांतर्फे कारवाईची नोटीस बजावण्यात आल्यानंतर कोपर स्थानकाजवळील झोपडपट्टीवासियांनी रेल रोको केल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली

Movement of slum dwellers, railway service jam during Dombivli-Kopar | डोंबिवली-कोपरदरम्यान झोपडपट्टीवासियांचे आंदोलन, रेल्वेसेवा ठप्प

डोंबिवली-कोपरदरम्यान झोपडपट्टीवासियांचे आंदोलन, रेल्वेसेवा ठप्प

Next
>ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. १२ - रेल्वे अधिका-यांतर्फे कारवाईची नोटीस बजावण्यात आल्यानंतर कोपर स्थानकाजवळील झोपडपट्टीवासियांनी रेल रोको केल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. 
कोपर स्थानकाजवळील सिद्धार्थनगर झोपडपट्टीतील रहिवाशांना रेल्वेतर्फे कारवाईची नोटीस बजावण्यात आली होती. झोपडपट्टी तोडण्याच्या कामाच्या निषेधार्थ झोपडपट्टीवासियांनी रेल्वे अधिका-यांच्या कारवाईचा निषेध करत गुरूवारी दुपारी रेल रोको केला. मात्र त्यामुळे अप व डाऊन मार्गावरील जलद व धिमी लोकल सेवा ठप्प झालीय 
रेल्वे पोलीस दल, लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी रहिवाश्यांना रेल रोको न करण्याचे आवाहन केले. थोड्याच वेळात रेल्वे सेवा पूर्ववत होईल असे समजते. 
 
 
 

Web Title: Movement of slum dwellers, railway service jam during Dombivli-Kopar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.