चालत्या बसने अचानक घेतला पेट

By admin | Published: February 11, 2017 10:20 PM2017-02-11T22:20:18+5:302017-02-11T22:20:18+5:30

मुलुंड बस आगारमधील 402 क्रमांकाची बस मुलुंड स्टेशन(पश्चिम) येथून वैशाली नगरकडे जात असताना बसनं अचानक पेट घेतला.

A moving bus suddenly took abdomen | चालत्या बसने अचानक घेतला पेट

चालत्या बसने अचानक घेतला पेट

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 11 -  मुलुंड बस आगारमधील  402 क्रमांकाची बस मुलुंड स्टेशन(पश्चिम) येथून वैशाली नगरकडे जात असताना बसनं अचानक पेट घेतला. नेताजी सुभाषचंद्र मार्ग येथे संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बसचालकाला बसमधून जळाल्याचा वास येऊ लागला. यावेळी बसमधून उतरुन पाहिले तर इंजिनला आग लागल्याचे समजले.
 
खबरदारी म्हणून यावेळी बसचालकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवले व फायर ब्रिगेडला पाचारण केले. फायर ब्रिगेडने घटनास्थळी धाव घेत आगीवर  नियंत्रण मिळवले. यावेळी बसमध्ये एकूण 15 प्रवासी होती. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 
 

Web Title: A moving bus suddenly took abdomen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.