चालत्या टॅक्सीत प्रवाशाला लुटले
By admin | Published: July 12, 2017 04:59 AM2017-07-12T04:59:53+5:302017-07-12T04:59:53+5:30
गिरगावात चालत्या टॅक्सीत गुन्हे शाखेच्या तोतया अधिकाऱ्याकडून प्रवाशाची लूट झाल्याची घटना गिरगावात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गिरगावात चालत्या टॅक्सीत गुन्हे शाखेच्या तोतया अधिकाऱ्याकडून प्रवाशाची लूट झाल्याची घटना गिरगावात घडली. यामध्ये ३० लाख रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. या प्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात फसवणूक, जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
गिरगाव परिसरात २७ वर्षीय मफ्फाराम गणेशाराम देवाशी कुटुंबीयांसोबत राहतो. तो खासगी कंपनीत काम करतो. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास गिरगाव परिसरात त्याला काही जणांनी अडविले, तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून टॅक्सीत बसविले. त्यानंतर, चालत्या टॅक्सीतच त्याच्याकडील पैशांची रोकड, त्याचा मोबाइल हिसकावला. त्याच्याकडे ३० लाख रुपयांची रोकड होती. त्यानंतर, देवाशीला मारहाण करून चालत्या टॅक्सीतून भुलेश्वर रोड परिसरात खाली उतरविले. त्याने तत्काळ व्ही.पी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. देवाशीने दिलेली माहिती व गुप्तमाहितीदारांच्या मदतीने अधिक तपास सुरू असताना, या लुटीमागील महत्त्वाचे धागेदोरी हाती लागले असल्याची माहिती व्ही. पी. रोड पोलिसांनी दिली.