...म्हणून भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज ठाकरेंना लिहिलं खास पत्र, केलं अभिनंदन!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 07:44 PM2021-03-08T19:44:16+5:302021-03-08T19:45:43+5:30

खासदार गोपाळ शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते रविवारपासूनच बोरिवलीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शेट्टी यांनी स्वतःच लोकमतला फोन करून या पत्रासंदर्भात माहिती दिली आहे.

MP Gopal Shetty congratulated Raj Thackeray for supporting the Nanar project in ratnagiri | ...म्हणून भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज ठाकरेंना लिहिलं खास पत्र, केलं अभिनंदन!

...म्हणून भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज ठाकरेंना लिहिलं खास पत्र, केलं अभिनंदन!

Next

 
मुंबई - कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्पाला समर्थन दिल्याबद्दल उत्तर मुंबईचे भाजप (BJP) खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे खास पत्र लिहून अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, विकासासाठी आणि हितासाठी नाणार प्रकल्पासंदर्भात आपण मांडलेली भूमिका रास्त आहे, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. (MP Gopal Shetty congratulated Raj Thackeray for supporting the Nanar project in Ratnagiri )

...अन् उद्धव ठाकरेंना लेटरबाजी करण्याचा प्लॅन शिजला; नाणार विरोधकांचा राज ठाकरेंवर आरोप

खासदार गोपाळ शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते रविवारपासूनच बोरिवलीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शेट्टी यांनी स्वतःच लोकमतला फोन करून या पत्रासंदर्भात माहिती दिली. यावेळी, रत्नागिरी राजापूरची रिफायनरी  चालू करून नाणार प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राबद्धलही शेट्टी यांनी राज ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.

कोरोना काळात देशत अनेकांना बेरोजगारीला तोंड द्यावे लागत आहे. त्यात अमर्याद स्वयंरोजगाराच्या संधी देणारा हा प्रकल्प सुरू करण्यात आला, तर नवीन पिढीसाठी रोजगार निर्मितीची मोठी पार्श्वभूमी तयार होणार आहे. असेही शेट्टी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

राज ठाकरेंची 'मन की बात' मुख्यमंत्री ऐकणार? मनसेप्रमुखांनी थेट शरद पवारांना फोन केला अन्...

याच बरोबर, 3 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा नाणार प्रकल्प नाकारणे योग्य ठरणार नाही. यासंदर्भातील वाद सुरुवातीपासूनच चिघळलेला आहे. पण 2000 कोंकणवासियांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात, या प्रकल्पात स्थानिक कोंकणी माणसांच्या रोजगारला प्राधान्य देण्याची तजवीज केली आहे. उद्योग निर्मितीची मोठी संधी प्रामुख्याने कोकणातील तरुणांना दिली तर एकूण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी हे हिताचे ठरेल, असे मतही शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले.
 
एकेकाळी संगणक आले की बेरोजगारी वाढत जाईल, अशी भीती बाळगली जात होती. पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे संगणका मार्फत "डिजिटल इंडिया"मुळे जागतिक पातळीवर पोहचले, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. याच बरोबर मारुती सुझुकीला एकेकाळी विरोध झाला आणि नंतर त्या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली, याकडेही खासदार शेट्टी यांनी राज ठाकरेंचे लक्ष वेधले.

राज ठाकरेंच्या मातोश्री आणि बहिणीने घेतली कोरोनाची लस; शर्मिला ठाकरेंचीही उपस्थिती

एखादा मोठा प्रकल्प किंवा बदल घडणार असेल तर त्याला विरोध होणे, हे साहजिकच आले. पण नाणार प्रकल्पामुळे कोंकणबरोबरच देशात बदल घडत असेल तर या प्रकल्पाचा तज्ञ व्यक्तींच्या मदतीने फेरविचार करावा लागेल. मात्र, फक्त संघर्षामुळे विकासाच्या वाटा बंद होऊन तमाम जनतेचे हित लांबवले जात आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Web Title: MP Gopal Shetty congratulated Raj Thackeray for supporting the Nanar project in ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.