Coronavirus: “कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त; मी रोज करते, तुम्हीही करा”: हेमा मालिनी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 10:37 AM2021-06-06T10:37:26+5:302021-06-06T10:39:45+5:30

Coronavirus: ज्येष्ठ अभिनेत्री आणि मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांनी अजब दावा केला आहे.

mp hema malini claims that havan useful in corona situation in country | Coronavirus: “कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त; मी रोज करते, तुम्हीही करा”: हेमा मालिनी 

Coronavirus: “कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त; मी रोज करते, तुम्हीही करा”: हेमा मालिनी 

Next
ठळक मुद्देकोरोना बचावासाठी हवन उपयुक्त असल्याचा हेमा मालिनी यांचा दावागृहक्लेश होत नाही आणि वातावरणही शुद्ध राहते: हेमा मालिनी

मुंबई: आताच्या घडीला देशात कोरोना संकटाचा कहर कायम आहे. नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट होत असली, तरी मृत्यूदर चिंता वाढवणारा ठरत आहे. तर दुसरीकडे ब्लॅक फंगस म्हणजेच काळ्या बुरशीचा आजार वाढताना दिसत आहे. कोरोनावरील नियंत्रणासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, लसींच्या तुटवड्यामुळे मोहिमेला खीळ बसताना दिसत आहे. यातच आता ज्येष्ठ अभिनेत्री आणि मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांनी अजब दावा केला आहे. कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त असल्याचे हेमा मालिनी यांचे म्हणणे आहे. (mp hema malini claims that havan useful to cure corona in country)

जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यातच हेमा मालिनी यांच्या मुंबईतील निवासस्थानी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हवन करण्यात आले. यावेळी हेमा मालिनी यांनी कोरोनातून बचावासाठी हवन उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. 

“मोदी सरकार केवळ श्रेय घेत राहिलं आणि देशात कोरोना वाढत गेला”: अमर्त्य सेन

कसे कराल हवन? 

हेमा मालिनी यांनी सांगितले की, भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून मी धूप घालून हवन करत आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन्हीवेळेस करते. या दोन्ही वेळेस धूपयुक्त हवन केल्याने गृहक्लेशही होत नाही. यामध्ये तूप, नीमची पाने आणि लोबान यांचा समावेश करावा. धूपयुक्त हवनमुळे घरातील वातावरण शुद्ध होते. लोबान आणि अन्य सामग्रीमुळे आजार रोखण्यास मदत होते. मी रोज हवन करते, तुम्हीही करा, असे हेमा मालिनी यांनी म्हटले आहे. 

भाजपमधील कलह वाढला! दिलीप घोष यांना कार्यकर्त्यांनी घेरले; बैठकीत गोंधळ

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात १ लाख १४ हजार ४६० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर याच कालावधीत २ हजार ६७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, १ लाख ८९ हजार २३२ जणांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. देशात आताच्या घडीला एकूण १४ लाख ७७ हजार ७९९ रुग्ण उपचार घेत असून, २३ कोटी १३ लाख २२ हजार ४१७ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. 
 

Web Title: mp hema malini claims that havan useful in corona situation in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.