उद्धव ठाकरेंचा गर्व देवानेच ठेचला; खा. नवनीत राणा यांचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 12:32 PM2023-04-06T12:32:14+5:302023-04-06T13:09:30+5:30

पोलीस प्रशासनाला हाताशी धरून खासदार महिला, आमदाराला घरातून अटक केली. त्यांची चूक काय होती? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी विचारला.

MP Navneet Rana criticized EX Chief Minister Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा गर्व देवानेच ठेचला; खा. नवनीत राणा यांचा जोरदार हल्लाबोल

उद्धव ठाकरेंचा गर्व देवानेच ठेचला; खा. नवनीत राणा यांचा जोरदार हल्लाबोल

googlenewsNext

अमरावती - उद्धव ठाकरे, तुमचा घमंड, गर्व देवानेच ठेचला. तुम किस खेत की मुली हो?..५६ वर्ष ज्या घराण्यात तुम्ही जन्माला आला ते घर टिकवू शकले नाही. विचारधारा टिकवू शकले नाहीत. आमदार सांभाळू शकले नाहीत. ज्या विचारधारेसाठी बाळासाहेबांनी जीवाचं रान केले. रक्ताचं पाणी केले, ते टिकवू शकले नाहीत. महाराष्ट्र काय बाळासाहेब ठाकरेंच्या डोळ्यातही अश्रू असतील. त्यांची विचारधारा बुडवण्याचं काम मुलानेच केले अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. हनुमान जन्मोत्सवानिमित्त राणा दाम्पत्यांकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. 

लॉकअपमध्ये कशी घालवली रात्र? स्टेजवर नवनीत राणांना अश्रू अनावर, काय घडलं?

खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, आज हनुमान चालीसा म्हटली म्हणून कुणी आपल्याला लॉकअपमध्ये टाकणार नाही. हनुमान चालीसा पठण केले म्हणून देशद्रोह खटला भरणार नाही. देशाच्या विरोधात काम करतोय असं कुणी म्हणणार नाही. ज्या भूमीत आपण सगळेच जन्मालो ती देवभूमी म्हणजे हिंदुस्तान, दगडातही देव शोधतो, आपली भक्ती-आस्था जोडली आहे. मातीच्या घरात राहत असो वा महलात राहत असला तरी देवाला मानतात. परंतु ज्या राज्याला संताची भूमी म्हणून ओळखले जाते याच महाराष्ट्रात ३३ महिन्याच्या सरकारने हनुमान चालीसा पठण केले म्हणून जेलमध्ये टाकले. आम्हाला हनुमान चालीसा म्हणण्याचा अधिकार नव्हता का? मुंबईत पाय ठेवला तर तुम्हाला गाडून टाकू अशी भाषा वापरली गेली तेव्हा महिला म्हणून मला काय वाटले असेल? असं त्यांनी सांगितले. 

तसेच अमरावतीने मला लढायला शिकवले, विदर्भाची सून म्हणून मी मुंबईत दाखल झाली. पोलीस प्रशासनाला हाताशी धरून खासदार महिला, आमदाराला घरातून अटक केली. त्यांची चूक काय होती? हनुमान चालीसा पठण करा आम्ही धमकी नव्हती तर विनंती केली होती. २५-३० पोलीस घरात घुसले. आम्ही महाराष्ट्राला डाग लावून देणार नाही असं आम्ही सांगितले तरीही बळजबरीने आम्हाला वाहनात बसवून पोलीस स्टेशनला नेले तेव्हा काय वाटले असेल? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी केला. 

दरम्यान, पोलिसांना उद्धव ठाकरेंनी आदेश दिले. कोणत्या गुन्ह्याखाली आम्हाला अटक केली? हे आम्ही  विचारले. ते म्हणाले, मॅडम, मला काय विचारू नका, आम्हाला आदेश आहे. ज्या बाळासाहेबांनी रक्त आटवून राज्यातील प्रत्येक नागरिकांमध्ये हिंदू विचारधारा दिली. लढणे कशाला म्हणतात ते त्यांनी शिकवले. मात्र त्यांच्या सुपुत्राने ५६ वर्षाच्या मेहनतीला, विचारधारेची माती करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केले असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. 

Web Title: MP Navneet Rana criticized EX Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.