आळशी माणूस शोधायचा असेल तर मातोश्रीकडे जा, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 11:11 AM2022-11-04T11:11:00+5:302022-11-04T11:11:46+5:30

गेल्या काही दिवसांपासून खासदार नवनीत राणा सातत्यानं उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत.

mp navneet rana targets shiv sena uddhav thackeray lazy person sushma andhare comment maharashtra devendra fadnavis | आळशी माणूस शोधायचा असेल तर मातोश्रीकडे जा, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

आळशी माणूस शोधायचा असेल तर मातोश्रीकडे जा, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Next

गेल्या काही दिवसांपासून खासदार नवनीत राणा सातत्यानं उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत आळशी माणूस शोधायचा असेल तर मातोश्रीकडे जा असं म्हणत खोचक टोला लगावला. शिवसेनेच्या नेत्या सुषणा अंधारे या गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राणा यांनी अंधारे यांना प्रत्युत्तर देताना थेट उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला.

“मी त्यांना ओळखत नाही. ज्या पद्धतीनं त्या टीका करत आहेत, ज्या पद्धतीनं अभिनय करतायत, ज्या पद्धतीनं मॅडम बोलतायत.. त्यांनी आधी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. नंतर देवेंद्र फडणवीस यांना सर्वात आळखी माणूस म्हटलं. मला नवल वाटतंय. त्यांना आळशी माणूस शोधायचा असेल तर त्यांनी मातोश्रीकडे जाऊन शोधावा,” असं राणा म्हणाल्या.

“उद्धव ठाकरे आपलं संपूर्ण आयुष्य ५६ वर्ष फिरले नसतील तेवढे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन महिन्यात फिरले असतील. जर आळशी माणूस शोधायचा असेल तर मातोश्रीच्या श्च्बाजूला जाऊन शोधला पाहिजे,” असं म्हणत राणा यांनी निशाणा साधला. टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं. आळशी व्यक्ती ऑफ द इयर म्हणून जर कोणाला शोधायचं असेल तर त्यांच्याच पक्षात शोधता येईल असंही त्या म्हणाल्या.

Web Title: mp navneet rana targets shiv sena uddhav thackeray lazy person sushma andhare comment maharashtra devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.