खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:06 AM2021-05-11T06:06:06+5:302021-05-11T06:11:27+5:30
खासदार सातव यांनी १९ एप्रिलला कोरोना चाचणी केली होती. २२ तारखेला अहवाल पॉझिटिव्ह आला. (Rajiv Satav)
पुणे : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांची तब्येत खालावली होती. पुण्यातील खासगी रूग्णालयात सातव यांच्यावर उपचार सुरु असून आता त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या त्यांच्यावर सामान्य वॉर्डमध्ये उपचार केले जात आहेत. लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.
खासदार सातव यांनी १९ एप्रिलला कोरोना चाचणी केली होती. २२ तारखेला अहवाल पॉझिटिव्ह आला. ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांना २५ तारखेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
खासदार सातव यांच्या तब्येतीवर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेते नजर ठेवून होते. त्यांच्याकडून सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात येत होती. डॉक्टरांचेही त्यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष होते