आम्ही भीक नाही, हक्क मागतोय; गरज पडेल तेव्हा तलवारी काढू; संभाजीराजे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 05:41 PM2020-10-09T17:41:32+5:302020-10-09T17:42:06+5:30

Sambhaji Raje : येत्या 15 तारखेला अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणाही संभाजीराजे यांनी केली.

mp sambhaji raje comment on maratha reservation in tuljapur osmanabad | आम्ही भीक नाही, हक्क मागतोय; गरज पडेल तेव्हा तलवारी काढू; संभाजीराजे आक्रमक

आम्ही भीक नाही, हक्क मागतोय; गरज पडेल तेव्हा तलवारी काढू; संभाजीराजे आक्रमक

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात होणारी मराठा आंदोलने भाजपा पुरस्कृत नाहीत, असेही संभाजीराजे यांनी यावेळी म्हटले आहे.

उस्मानाबाद : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. या मोर्चात खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार ओमराजे निंबाळकर सहभागी झाले आहे. यावेळी आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, संयम कधी सोडायचा माहीत आहे, पण गरज पडेल, त्यावेळी तलवारी  काढू, असा इशारा देत आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

संभाजीराजे काय म्हणाले? 
मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत असल्याचे दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका. संयम कधी सोडायचा माहीत आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा देत आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत, असे संभाजीराजे म्हणाले. तसेच, येत्या 15 तारखेला अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

याचबरोबर, १९०२ मध्ये शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिले. त्यात मराठा समाजाचाही समावेश होता. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची स्वराज्याची संकल्पना पुन्हा एकदा प्रस्थापित होणे आवश्यक आहे. ८० टक्के मराठा समाज गरीब आहे. मात्र आम्ही भीक मागत नाही हक्काचे आरक्षण मागतो आहोत. आम्हाला आता गृहीत धरु नका आणि कायदा हातात घ्यायची वेळ आमच्यावर आणू नका. माझ्या रक्तात शिवाजी महाराज आणि शाहू महाराज आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार, असे  संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

याशिवाय, आम्ही दिल्लीला पण येण्यासाठी घाबणार नाहीत, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारला आव्हान दिले आहे. माझा पक्ष गेला खड्यात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. राज्यात होणारी मराठा आंदोलने भाजपा पुरस्कृत नाहीत, असेही संभाजीराजे यांनी यावेळी म्हटले आहे.
 

Web Title: mp sambhaji raje comment on maratha reservation in tuljapur osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.