राज्यात २ वेगळे कायदे आहेत का? सुलतान प्रचारात दंग; संजय राऊत सरकारवर कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 11:30 AM2023-11-30T11:30:23+5:302023-11-30T11:31:16+5:30

गद्दार आणि बेईमान लोकांना वेगळा कायदा आणि इतरांसाठी वेगळा कायदा लावला असेल तर तसे जाहीर करावे असं राऊतांनी म्हटलं.

MP Sanjay Raut targets Chief Minister Eknath Shinde over Datta Dalvi case | राज्यात २ वेगळे कायदे आहेत का? सुलतान प्रचारात दंग; संजय राऊत सरकारवर कडाडले

राज्यात २ वेगळे कायदे आहेत का? सुलतान प्रचारात दंग; संजय राऊत सरकारवर कडाडले

मुंबई - आमच्या दत्ता दळवींची काहींनी गाडी फोडली, ठीकय..दळवी बाहेर येतील आणि आमचे शिवसैनिक जागेवरच आहेत. ज्यांनी गाडी फोडली त्यांनी जर खरा मर्द असता तर तिथेच थांबायला पाहिजे होते. पळून काय जाताय? तुम्ही तुमच्या नेत्यांच्या सांगण्यावरून आलेला आहात मग तुमचा नेता नामर्द आहे का? अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर घणाघात केला आहे. 

भांडुप येथे दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले म्हणून त्यांना अटक केली. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी दत्ता दळवी यांचे वाहन फोडले. त्यावर संजय राऊत म्हणाले की, आम्ही गाडी फोडली, पळून का जाता आम्ही तिथे आलोच असतो. शिवसैनिक पोहचलेच असते. या नामर्दानगी म्हणतात. राज्यात नामर्दाचे सरकार आहे.सुप्रिया सुळेंवर अपशब्द वापरले त्या अब्दुल सत्तारवर काय कारवाई केली? प्रकाश सुर्वेने तंगड्या तोडण्याची भाषा केली काय कारवाई केली? त्यांच्या मुलाने पिस्तुल दाखवत एका बिल्डरचे अपहरण केले तु्म्ही काय कारवाई केली? भाजपा, मिंदे गटाच्या आमदारांवर काय कारवाई केली याचे उत्तर तुम्ही आधी द्या. मग दत्ता दळवी यांच्या कारवाईवर बोला असं त्यांनी सांगितले. 

तसेच या राज्यात २ कायदे आहेत का? गद्दारांसाठी वेगळा आणि जनतेसाठी वेगळा..गद्दार आणि बेईमान लोकांना वेगळा कायदा आणि इतरांसाठी वेगळा कायदा लावला असेल तर तसे जाहीर करावे. राज्यपाल हे घटनात्मक पदावर आहेत. त्यांनी सांगावे. राज्यात २ कायदे आहेत का? जो शब्द दत्ता दळवींनी वापरला तो चित्रपटात वापरला जातो, तो कापला जात नाही. आनंद दिघेंवर दंतकथात्मक चित्रपट बनवला त्यात दिघेंच्या तोंडी तो शब्द आहे. दिघेंनी वापरलेला शब्द त्यांच्या शिवसैनिकांनी वापरला तर तुम्ही त्याला तुरुंगात टाकता. हा तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांचा अपमान नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. 

दरम्यान, दत्ता दळवी प्रकरणी पोलिसांवर दबाव आहे. मी असो वा अन्य कुठलाही शिवसैनिक तुरुंगात गेल्यानं घाबरणार नाही. आम्ही डरपोक आणि नामर्द नाही. राज्यात शेतकरी हवालदिल आहेत. अवकाळी पावसामुळे गंभीर स्थिती झालीय. शेतकरी बांधावर आहे, मनात आत्महत्येचे विचार येतायेत. उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालंय. सरकार कुठे आहे? सरकार पसार झालं आहे. अस्मानी संकट कोसळत असताना राज्याचे मुख्य सुलतान आणि २ डेप्युटी सुलतान हे प्रचारात गेलेत. सुलतान तेलंगणा, जयपूर असं निवडणूक पर्यटन सुरू आहे असा आरोपही संजय राऊतांनी राज्य सरकारवर केला. 

Web Title: MP Sanjay Raut targets Chief Minister Eknath Shinde over Datta Dalvi case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.