चिन्ह गोठवल्याने शिवसेना पक्ष संपणार का? शरद पवारांनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 10:42 AM2022-10-09T10:42:00+5:302022-10-09T10:45:01+5:30

शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे आमचीच खरी शिवसेना असा दावा केला होता.

MP Sharad Pawar said that the party will not end because the party symbol of Shiv Sena has been frozen and it will grow vigorously again | चिन्ह गोठवल्याने शिवसेना पक्ष संपणार का? शरद पवारांनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...

चिन्ह गोठवल्याने शिवसेना पक्ष संपणार का? शरद पवारांनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...

googlenewsNext

मुंबई: शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे आमचीच खरी शिवसेना असा दावा केला होता. त्यावरून आयोगाने दोन्ही गटाकडून आवश्यक कागदपत्रे मागवली. त्यानंतर हा वाद सुप्रीम कोर्टात गेला. परंतु कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर कागदपत्रांच्या आधारे आयोगाने तात्पुरतं दोन्ही गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही असं स्पष्ट केले आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.  

"शिवसेनेचे चिन्ह गोठवण्यात येणार असं काही होणार याची मला खात्री होती. याचे मला आश्चर्य वाटले नाही, निर्णय कोण घेत हे मला माहित नाही. आता शिवसेनेने निवडणुकांना समोरे जायची तयारी अगोदर केली पाहिजे. याअगोदर मी स्वतं: वेगवेगळ्या चिन्हावर लढलो आहे, त्याचा काही तोटा होत नाही. लोक ठरवतात कोणाला निवडून द्यायचे. शिवसेना पक्ष यामुळे अजिबात संपणार नाही उलट पक्ष जोमाने पुन्हा वाढेल, अशी प्रतिक्रिया खासदार शरद पवार यांनी दिली.

खेळलेला डाव कधीही त्यांच्यावर उलटला जाऊ शकतो; राष्ट्रवादीचा भाजपाला सूचक इशारा

'या निर्णयाचा महाविकास आघाडीवरही कोणताही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडी कायम एकत्र राहणार आहे. शिवसेनेच्या नव्या नावावरही पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेना कंसात बाळासाहेब ठाकरे, असं नाव शरद पवार यांनी सुचविले. हे असं याअगोदर काँग्रेसमध्ये झाले आहे, याअगोदर इंदीरा गांधी यांच्या काळात झालेल्या दोन घटनांचे पवार यांनी यावेळी उदाहरण दिले. 

राष्ट्रवादीचा भाजपाला सूचक इशारा

शिवसेनेतील या वादामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्यात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे. क्रास्टो यांनी ट्विट करत म्हटलंय की, भाजपाचे 'ऑपरेशन लोटस' नव्हे, हे तर 'ऑपरेशन डिवाइड अँड रूल' होते. इंग्रजांची पॉलिसी वापरून एक हौशी मोहरा वापरला आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी यांची शिवसेना व धनुष्य बाण गोठवले. पण भाजपने हे लक्षात ठेवावे, त्यांनी खेळलेला हा डाव कधी त्यांच्यावर देखील उलटला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. 

भाजपा कुठेही दिसणार नाही
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली. मी रात्रभर झोपलो नाही. देवा हे काय केलंस तू? यांचा बंदोबस्त कर देवा. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी ते संपणार आहेत. निवडणूक आयोग यंत्रणा केंद्राच्या हातात आहे. हा लोकशाहीचा खून आहे. अंधेरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्याठिकाणी शिवसेनेचा उमेदवार जिंकून येणारच. साधा रिक्षावाल्याने कोट्यवधी रुपये छापले. उद्धव ठाकरेंनी केवळ हात वर केला. याचे परिणाम भयानक होतील. भाजपा कुठेही दिसणार नाही. एकनाथ शिंदे संपणार आहे असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.

Web Title: MP Sharad Pawar said that the party will not end because the party symbol of Shiv Sena has been frozen and it will grow vigorously again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.