मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत श्रीकांत शिंदे?; स्वतःच सांगितली व्हायरल फोटोमागची खरी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 02:52 PM2022-09-23T14:52:44+5:302022-09-23T14:52:44+5:30
राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते रविकांत वरपे यांनी यांनी श्रीकांत शिंदेंचा एक फोटो ट्वीट केला होता.
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनं एक फोटो ट्वीट करत मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते रविकांत वरपे यांनी यांनी श्रीकांत शिंदेंचा एक फोटो ट्वीट केला आहे. त्यात ते मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचा कारभार सांभाळतात असा आरोपही त्यांनी केलाय. आता यावर खुद्द श्रीकांत शिंदे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.
“हा सर्व प्रकार हास्यास्पद आहे. हा फोटो शेअर केला जातोय आणि त्यावर बातम्याही मी पाहिल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिशय सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते दिवसाचे १८-२० तास काम करतायत. त्यांच्या गैरहजेरीत त्यांचा कारभार सांभाळायची कोणालाही गरज नाही,” असं स्पष्टीकरण श्रीकांत शिंदे यांनी दिलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत श्रीकांत शिंदे?; 'त्या' फोटोवर खुलासा श्रीकांत शिंदे "सुपर सीएम" असल्याच्या राष्ट्रवादीच्या आरोपाला @DrSEShinde खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचं प्रत्युत्तर... pic.twitter.com/NvqaZHWc3W
— Lokmat (@lokmat) September 23, 2022
“ज्या कार्यालयाचा फोटो व्हायरल होतोय ते आमच्या ठाण्याच्या घरातील कार्यालय आहे. जो फोटो आपण पाहिला ती खुर्ची माझी आहे. आम्ही दोघंही या कार्यालयाचा वापर करतो. ते मुख्यमंत्री होण्याच्या आधीपासून या ठिकाणी हजोरो लोक भेटण्यासाठी येत असतात. त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम इथून होतं. हे शासकीय घर नाही. सर्व गोष्टींच्या माध्यमातून बदनाम करण्याचं जे काम होतंय, मी एकच सांगू इच्छितो आज हे जे ऑफिस आहे ते आमचं घर आहे. आम्ही वर्षानुवर्ष या ठिकाणी बसत आहोत. बोर्ड या ठिकाणी तात्पुरता ठेवण्यात आला होता. एकनाथ शिंदेंची व्हीसी होती, त्यामुळे पूर्वतयारी म्हणून ठेवला गेला होता. हा फोटो वेगळ्या अँगलनं काढला गेला. हा मुव्हेबल बोर्ड आहे. एकाच ठिकाणी बसून राज्याच्या कारभार हाकतात असे हे मुख्यमंत्री नाहीत. जिथून संधी मिळते तिथून ते काम करत असतात,” असंही ते म्हणाले.
खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.
मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय.हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर?@mieknathshinde@DrSEShindepic.twitter.com/rpOZimHnxL— Ravikant Varpe - रविकांत वरपे (@ravikantvarpe) September 23, 2022
कायम्हणालेहोतेवरपे?
खा. श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?, असा सवाल वरपे यांनी फोटो ट्वीट करत केला होता.