"शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके"; अमित शाहांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "तुम्ही आधी ठरवा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 09:55 AM2024-07-22T09:55:19+5:302024-07-22T09:55:59+5:30

भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केले म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीका केली होती.

MP Supriya Sule has now responded to Amit Shah criticism of Sharad Pawar | "शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके"; अमित शाहांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "तुम्ही आधी ठरवा..."

"शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके"; अमित शाहांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "तुम्ही आधी ठरवा..."

Supriya Sule Replied To Amit Shah : पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं आहे अशी घणाघाती टीका अमित शाह यांनी केली. अमित शाह यांनी केलेल्या टीकेला आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार नक्की काय आहेत हे भाजपनं ठरवावं अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांना प्रत्युत्तर दिलं.

पुण्यात भाजपच्या दोन दिवस राज्य कार्यकारिणीचे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित झाला. यावेळी बोलताना अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम शरद पवार यांनी केलं आहे, असं अमित शाह म्हणाले होते. यावरुन आता खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता असं म्हटलं.

शरद पवार सत्तेवर आले की मराठा आरक्षण जाते - अमित शाह

"जेव्हा जेव्हा राज्यात भाजपाची सत्ता आली तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे. जेव्हा शरद पवार यांची सत्ता येते तेव्हा मराठा आरक्षण जाते. २०१४ ला भाजपा सत्तेत आली मराठा आरक्षण आलं, २०१९ ला शरद पवार सत्तेत आले तेव्हा मराठा आरक्षण गेलं. त्यामुळे आता तुम्ही ठरवा काय करायचं ते," असेही अमित शाह म्हणाले.

सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर
 
"आज भाजपचे लोक ज्याला एनडीए सरकार म्हणतात, ते काही महिन्यांपूर्वी मोदी सरकार होतं. याच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यामुळे शरद पवार नक्की काय आहेत हे भाजपनं ठरवावं. अमित शाह हे त्याच सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, हे सर्व ते विसरले असतील, त्यामुळे त्यांनी टीका केली,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

"भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते नेते आज महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत. अमित शाहांच्या कार्यक्रमात ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त भ्रष्टाचाराचे आरोप होते ते अशोक चव्हाण यांच्या मागे बसले होते, महाराष्ट्रच नाही, तर त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारपर्यंत ज्या नेत्यांवर त्यांनी आरोप केले. ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यापैकी ९० टक्के लोक आज भाजपमध्ये आहेत ते वॉशिंग मशीनमुळे," असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला.

Web Title: MP Supriya Sule has now responded to Amit Shah criticism of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.