Maharashtra Politics: “जे विरोधात बोलतात, त्यांच्यावर अशाप्रकारची कारवाई, ईडी सरकारने…”; सुप्रिया सुळे संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 02:22 PM2023-01-11T14:22:04+5:302023-01-11T14:23:36+5:30

Maharashtra News: एक गोष्ट प्रांजळपणे ईडी सरकारला सांगायची आहे की, अशी कटकारस्थाने कारण्यापेक्षा...; सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका.

mp supriya sule reaction over ed raid on ncp leader hasan mushrif in kolhapur | Maharashtra Politics: “जे विरोधात बोलतात, त्यांच्यावर अशाप्रकारची कारवाई, ईडी सरकारने…”; सुप्रिया सुळे संतापल्या

Maharashtra Politics: “जे विरोधात बोलतात, त्यांच्यावर अशाप्रकारची कारवाई, ईडी सरकारने…”; सुप्रिया सुळे संतापल्या

googlenewsNext

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी आज पहाटे पुन्हा ईडीने छापा टाकला. सुमारे २६ अधिकाऱ्यांचे पथक आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. माजी नगराध्यक्ष व मुश्रीफ यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रकाश गाडेकर यांच्या घरीही छापा पडला आहे. या घटनेमुळे कोल्हापूर खळबळ उडाली आहे. हसन मुश्रीफ हे बाहरेगावी आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एक गोष्ट प्रांजळपणे ईडी सरकारला सांगायची आहे. ही अशी कटकारस्थाने कारण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राचा विकास, बेरोजगारी आणि महागाई यावर लक्षे दिले तर मायबाप महाराष्ट्राच्या जनतेचे भले होईल. नुकतीच एक बातमी प्रकाशित झाली होती, ज्यामध्ये आरटीआयद्वारे अशी माहिती समोर आली की, देशातील ९० ते ९५ टक्के विरोधी पक्षांतील लोकांवर धाडी पडल्या आहेत किंवा त्यांच्यावर आरोप झालेले आहे. महाराष्ट्राचे सरकार तर अभिमानाने स्वतःला ईडी सरकार म्हणजेच एकनाथ आणि देवेंद्र यांचे सरकार असल्याचे म्हणतात. जे त्यांच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर अशी कारवाई झाल्याचे वारंवार दिसत आहे, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी या कारवाईबाबत सरकारचा समाचार घेतला.

आमच्याकडून कोणत्याही चौकशीला पूर्णपणे सहकार्य केले जाईल

आमच्याकडून कोणत्याही चौकशीला पूर्णपणे सहकार्य केले जाईल. आमच्याकडे लपवायला खरेच काहीही नाही. अतिथी देवो भव, आमच्याकडे पाहुणे आलेत त्यांचे स्वागत करुच. राज्यात ईडी म्हणजेच एकनाथ-देवेंद्र यांचे सरकार आहे. जे सरकारच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर अशाप्रकारची कारवाई केली जात आहे, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला. 

दरम्यान, शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय बातमी होत नाही. आमच्यावर इतके लोक आरोप करतात कारण त्याशिवाय त्यांची हेडलाईन होत नाही. माझे त्यांना नम्रपणे आवाहन आहे की, तुम्ही या गोष्टी करत राहा. हा तुमचा अधिकार आहे. पण सत्तेचा गैरवापर करण्याची परिसीमा या सरकारने गाठली आहे, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: mp supriya sule reaction over ed raid on ncp leader hasan mushrif in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.