Maratha Reservation: “संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत”: उदयनराजे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 01:05 PM2021-06-06T13:05:22+5:302021-06-06T13:08:15+5:30

Maratha Resrvation: मराठा समाजाचा उद्रेक झाला, तर त्याला राज्यकर्ते जबाबदार असतील, असे खासदार उदयनराजे यांनी म्हटले आहे.

mp udayanraje bhosale react on maratha reservation and says sambhajiraje is my younger brother | Maratha Reservation: “संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत”: उदयनराजे

Maratha Reservation: “संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत”: उदयनराजे

googlenewsNext
ठळक मुद्देमराठा समाजाचा उद्रेक झाला, तर त्याला राज्यकर्ते जबाबदार असतीलसंभाजीराजे माझे धाकडे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीतमराठा आरक्षणावरून उदयनराजेंची आक्रमक भूमिका

सातारा: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर पुन्हा एकदा यावरून राजकारण तापताना दिसत आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर संभाजीराजे यांनी एल्गार केला असून, १६ जूनपासून कोल्हापूरातून राजर्षि शाहुंच्या समाधीपासून राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनास प्रांरभ केला जाईल, असे इशारा देण्यात आला आहे. यातच आता उदयनराजे यांनीही मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली असून, मराठा समाजाचा उद्रेक झाला, तर त्याला राज्यकर्ते जबाबदार असतील, असे म्हटले आहे. (mp udayanraje bhosale react on maratha reservation and says sambhajiraje is my younger brother)

संभाजीराजे माझे धाकडे भाऊ आहेत. तसेच आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करायची वेळ येते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता मराठा आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारने लवकरात लवकर भूमिका घ्यावी, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संभाजीराजेंच्या भूमिकेला विरोध करण्याचा प्रश्नच नाही. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात, पण त्यांचे विचार आचरणात आणले जात नाही. शिवाजी महाराजांना अशी लोकशाही अभिप्रेत नाही. शिवाजी महाराजांचे विचार अमलात आणले गेले नाहीत, तर देशाचे तुकडे पडतील, असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.

“मी मेलो तरी चालेल पण...”: रायगडावर मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीराजे कडाडले

मराठा समाजाबाबत भेदभाव का?

गायकवाड समिचीचा अहवाल त्याचं व्यवस्थित वाचन झाले नाही, झाले असते तर सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला नसता, असा दावा करत आरक्षण हे वेगवेगळ्या जातींना जीआर काढून देण्यात आले, कोणाचे काढून न घेता आरक्षण द्या, मराठा समाजाबाबत भेदभाव का?, असा रोकडा सवालही उदयनराजे यांनी केला आहे. 

“कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त; मी रोज करते, तुम्हीही करा”: हेमा मालिनी

आता मी संयम बाजूला केला आहे

रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमानंतर संभाजीराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली आहे. आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला. पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवले आहे की आंदोलन हे निश्चित आहे. येत्या १६ जूनला पहिला मोर्चा काढणार असल्याचा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे. 

भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात FIR; ताडपत्री चोरल्याचा आरोप

दरम्यान, कोरोनाचे संकट संपल्यानंतर तुम्ही ठोस पावले उचलली नाहीत, तर संभाजीराजांसह संपूर्ण मराठा समाज मुंबईपर्यंत लाँग मार्च करणार. तिथे तुम्हाला लाठी मारायची असेल, तर पहिली लाठी संभाजीराजेला मारावी लागेल. छत्रपतींच्या वंशजावर पहिली लाठी मारावी लागेल. आम्हाला गृहीत धरू नका, एवढेच सांगतो. आमची मागणी एकच आहे, आम्हाला न्याय द्या. कोण चुकले त्याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही, असे सांगत संभाजीराजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 
 

Web Title: mp udayanraje bhosale react on maratha reservation and says sambhajiraje is my younger brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.