"नको होतं ते घडलं, चंद्रहार पराभूत झाला तरी..."; विशाल पाटलांनी भेट घेतल्यावर उद्धव ठाकरेंचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 05:17 PM2024-08-07T17:17:03+5:302024-08-07T17:18:31+5:30

सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विशाल पाटील यांनी दिल्लीत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

MP Vishal Patil and Vishwajit Kadam met Uddhav Thackeray at delhi | "नको होतं ते घडलं, चंद्रहार पराभूत झाला तरी..."; विशाल पाटलांनी भेट घेतल्यावर उद्धव ठाकरेंचे विधान

"नको होतं ते घडलं, चंद्रहार पराभूत झाला तरी..."; विशाल पाटलांनी भेट घेतल्यावर उद्धव ठाकरेंचे विधान

MP Vishal Patil Meet Uddhav Thackeray :  सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी दिल्लीत दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठकरे यांची भेट घेतली. सांगली लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये वाद झाला होता. त्यावेळी ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करुन टाकली. त्यानंतर काँग्रेसच्या इच्छुक विशाल पाटील यांनी अपक्ष लढत निवडणूक जिंकली होती. विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे. त्यानंतर आता दिल्लीत झालेल्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी विशाल पाटील यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी सांगली लोकसभा मतदारसंघावरुन ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाज झाला होता. उद्धव ठाकरेंनी सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. पण, काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड केले ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव झाला. लोकसभेच्या या निकालानंतर पहिल्यांदाच विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांची उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.

उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या भेटीदरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सांगलीतल्या राजकीय नाट्याबाबत भाष्य केलं आहे. या भेटीबाबत पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या पराभवाचं शल्य आहे. पण सांगलीत भाजपचा पराभव झाला, हे महत्वाचं आहे, असं म्हटलं. 

"विशाल पाटील, विश्वजीत कदम, चंद्रहार पाटील ही तरुण मुलं आहेत. मनात डूख धरून ठेवणारा मी नाही. त्यावेळी जे घडायला नको होतं ते घडलं. पण एक गोष्ट नक्की. आम्ही भाजपाचा पराभव केला. भलेही चंद्रहार पराभूत झाला असेल. पण भाजप जिंकला नाही. आता विशालही महाविकास आघाडीच्या परिवारात येणार असेल आणि पुढच्या वाटचालीत झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत अशी खात्री त्यानं दिली असेल तर ती गोष्ट मनात धरून राहण्याचं कारण नाही. विशाल पाटील, विश्वजीत कदमांनी माझा पक्ष फोडलेला नाही," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Web Title: MP Vishal Patil and Vishwajit Kadam met Uddhav Thackeray at delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.