खासदारांनी दत्तक घेऊन गाव पोरकं सोडलं!

By admin | Published: October 5, 2015 01:11 AM2015-10-05T01:11:24+5:302015-10-05T01:11:24+5:30

सांसद आदर्श गाव योजनेत राज्यात सर्वाधिक ८ गावे पुणे जिल्ह्यात आहेत. मात्र, ही योजना सुरू होऊन वर्ष उलटले तरी ठोस कामे होत नसल्याने ‘दत्तक घेतलं,

MPs adopted by the MPs! | खासदारांनी दत्तक घेऊन गाव पोरकं सोडलं!

खासदारांनी दत्तक घेऊन गाव पोरकं सोडलं!

Next

बापू बैैलकर, पुणे
सांसद आदर्श गाव योजनेत राज्यात सर्वाधिक ८ गावे पुणे जिल्ह्यात आहेत. मात्र, ही योजना सुरू होऊन वर्ष उलटले तरी ठोस कामे होत नसल्याने ‘दत्तक घेतलं, पोरकं सोडलं’ अशी या गावातील ग्रामस्थांनी भावना झाली आहे. आराखडे तयार झाले असून कामे अद्याप निविदा प्रक्रियेतच अडकली आहेत.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर तालुक्यातील करंदी, पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांनी हवेलीतील वडगाव शिंद, माजिद मेमन यांनी जुन्नर तालुक्यातील टिकेकरवाडी , सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील दापोडी, वंदना चव्हाण यांनी मावळ तालुक्यातील सदुंब्रे, डी. पी. त्रिपाटी यांनी बारामतीतील मुर्टी ,संजय काकडे यांनी शिरूरमधील जांबूत आणि अशोक गांगुली यांनी पुरंदरमधील गुळूंचे गाव दत्तक घेतले आहे. ११ आॅक्टोबर २०१४ रोजी ही योजना कार्यान्वीत झाली असून ही गावे आॅक्टोबर २०१६ पर्यंत आदर्श करावयाची आहेत. मात्र, एक वर्षात केवळ ग्रामविकास आराखडे, बेसलाईन सर्व्हे झाले असून आता कुठे निविदा प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. कामे आलीच नाहीत व झालीही नाहीत, अशा भावना यातील काही गावांच्या ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. दोन वर्षे आराखड्यात गेले. आता कुठे कामांना सुरूवात होत आहे.
दापोडीचे सरपंच राजेंद्र नरोटे यांनी सांगितले की, कामांना आता वेग आला आहे. अंगणवाड्या, वाचनालय, प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. उद्या पोस्ट आॅफिसचे उद्घाटन होणार आहे. या योजनेचा नुकत्याच झालेल्या दक्षता समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी या गावांसाठी ८ प्रकारचे आराखडे केले आहेत.
यात राज्य व केंद्र सरकारच्या एकत्रित योजनांचा लाभ देण्यात येणार
असून यात फक्त भौतिक सुधारणा न करता गावचे वातावरणच बदलण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार आमदार बाबुराव पाचर्णे यांनीही या गावांचे बजेट २९ कोटींपर्र्यत असून प्रत्यक्ष २ कोटी खर्च होतोय, मग विकास कसा होणार, असा प्रश्न उपस्थित केला होता.
---------आम्ही गावे परके सोडल्याच्या ग्रामस्थांच्या भावना आहेत. मात्र, आता दत्तक गावांमध्ये विकास योजना झपाट्याने होणार असून ग्रामस्थांना गावातच रोजगार उपलब्ध करुन ती स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे खासदार आढळराव पाटील यांनी नुकत्याच झालेल्या दक्षता समितीच्या बैठकीत सांगितले आहे.
वडगाव शिंदेचे सरपंच भरत काकडे यांच्याशी संपर्क साधला असता, कामे आलीच नाहीत. आता मंजूर झाली आहेत. कधी कामे होणार, असा प्रश्न उपस्थित केला. आम्ही आमच्या परीने पाठपुरावा करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुर्टी गावचे माजी उपसरपंच तानाजी खोमणे यांनी सांगितले, अद्याप एकही काम सुरू झाले नाही. खासदारसाहेब या योजनेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले होते. ते पुन्हा फिरकले नाहीत. ग्रामपंचायतीला एवढा निधी मिळणार आहे, अशी पत्र फक्त येत आहेत. बरेच प्रस्ताव दिले आहेत. मात्र कोणत्याच कामासाठी पैैसे आले नाहीत.

Web Title: MPs adopted by the MPs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.