...तर खासदारकीचा राजीनामा : उदयनराजे
By admin | Published: October 30, 2016 01:07 AM2016-10-30T01:07:54+5:302016-10-30T01:07:54+5:30
सर्वसामान्य लोकांनी मोठे व्हायचे नाही का? प्रत्येकाच्या मनात महत्त्वकांक्षा असते. मीच आमदार, मीच अध्यक्ष, असे कुठे होते का? एकच सांगतो, कोणी काही म्हणत
सातारा : ‘सर्वसामान्य लोकांनी मोठे व्हायचे नाही का? प्रत्येकाच्या मनात महत्त्वकांक्षा असते. मीच आमदार, मीच अध्यक्ष, असे कुठे होते का? एकच सांगतो, कोणी काही म्हणत असेल; पण या नगरपालिका निवडणुकीत ४०-० नाही केले तर खासदारकीचा राजीनामा देईन,’ असे खुले आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंना दिले.
‘सातारा विकास आघाडी’च्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधवी कदम यांच्यासह आघाडीतील नगरसेवकांचे उमदेवारी अर्ज भरण्यासाठी उदयनराजे शनिवारी पालिकेत आले होते. पत्रकांराशी बोलताना ते म्हणाले की, ‘ज्या लोकांवर मी अत्यंत प्रेम करतो, त्यात माझे काका शिवाजीराव भोसले आहेत. ते त्यांच्यासोबत (शिवेंद्रसिंहराजे) अर्ज भरायला आले आहेत. त्यांना डावलून मी अर्ज भरायला आलो नसतो; पण तत्त्व हे तत्त्व असते. वाटेल त्या परिस्थितीत मोडेन; पण तत्त्वाशी तडजोड करणार नाही.
‘उदयनराजेंच्या आडमुठेपणामुळे मनोमिलन दुभंगले,’ असे वक्तव्य आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी शुक्रवारी केले होते.
यावर बोलताना उदयनराजे म्हणाले, ‘मी आडमुठेपणा केला असता तर २२ महिने तुरुंगामध्ये नसतो. मला कोणी तुरुंगामध्ये घातले ते सगळ्यांना माहीत आहे. (प्रतिनिधी)
तो मै खुदकी भी नही सुनता !
‘शत्रूचा शत्रू म्हणजे माझा मित्र मानणारापैकी मी नाही, मी सगळ्यांचाच मित्र आहे. माझी अवस्था अशी का झाली माहिती आहे का. माझं एक आवडतं गाणं आहे. ‘काय बाय सांगू.. कसं गं सांगू.. मलाच माझी वाटे लाज..,’ असं त्यांनी अगदी सुरात गाण म्हटलं. काय करायचं कोणाविषयी बोलायचं नाही. पण एक सांगतो, ‘एक बार जो मैने कमिटमेंट करदी, तो मै खुदकी भी नही सुनता.. एवढंच सांगतो,’ असं म्हणून त्यांनी हाताची चुटकी वाजवली आणि जमावाकडे बोट दाखवत, ‘या सगळ्यांशी कमिटमेंट केलीय,’ असे सांगितलं.