एमपीएससीने विद्यार्थ्यांसाठी तयार केले मोबाइल ॲप; गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 07:32 AM2022-06-07T07:32:38+5:302022-06-07T07:32:58+5:30

महत्त्वाचे म्हणजे याचाच पुढचा भाग म्हणून एमपीएससीने आता विद्यार्थ्यांसाठी ट्विटरनंतर ॲप लॉन्च केले आहे. उपयोजक हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. 

MPSC develops mobile app for students; Available on the Google Play Store | एमपीएससीने विद्यार्थ्यांसाठी तयार केले मोबाइल ॲप; गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध

एमपीएससीने विद्यार्थ्यांसाठी तयार केले मोबाइल ॲप; गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) विद्यार्थीभिमुख बनण्याचा प्रयत्न करत आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचा एमपीएससी प्रयत्नशील आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत तिथून सुटण्यासाठी मदत होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आयोगाच्या कार्यालयापर्यंत जाण्याचा वेळ वाचत आहे. महत्त्वाचे म्हणजे याचाच पुढचा भाग म्हणून एमपीएससीने आता विद्यार्थ्यांसाठी ट्विटरनंतर ॲप लॉन्च केले आहे. उपयोजक हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. 

आधी संकेतस्थळ, नंतर ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आयोगाशी थेट संपर्क करता येणे शक्य झाले. तंत्रज्ञानाचा वापर करून या गोष्टींचा ॲपमध्ये समावेश व्हावा असे एमपीएससीने ॲप विकसित केले आहे. त्यात दुसऱ्या टप्प्यात 
ते विकसित करताना आणखी काही सुविधांचा समावेश होणे आवश्यक आहे जेणेकरून ते विद्यार्थीकेंद्री होईल, अशी प्रतिक्रिया एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे यांनी दिली.

 ॲपमध्ये काय? 
या ॲपमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात विविध परीक्षांची माहिती आणि जाहिराती तर दिसणारच आहेत. या शिवाय डॅशबोर्डवर सूचना/परिपत्रके, वेळापत्रके, अभ्यासक्रम, मागील प्रश्नसंच, उत्तरतालिका, निकाल या सगळ्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना या ॲपवरून थेट आयोगाच्या ट्विटर हँडललाही जाता येणार आहे. 

Web Title: MPSC develops mobile app for students; Available on the Google Play Store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.