सरळसेवा चाळणी परीक्षा ढकलली पुढे, आता ८ फेब्रुवारी रोजी होणार
By योगेश पायघन | Published: January 19, 2023 08:36 PM2023-01-19T20:36:13+5:302023-01-19T20:36:38+5:30
अधिक माहिती आणि वेळापत्रक एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या विशिष्ट शैक्षणिक अर्हता, अनुभवावर आधारीत भरतीसाठीची चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ३० जानेवारी रोजी होणारी ही परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
नगर रचनाकार, विधी अधिकारी, सहाय्यक संचालक महाराष्ट्र शहर नियोजन आणि मुल्यनिर्धारण सेवा, सहाय्यक विधि सल्लागार नि अवर सचिव, औषधनिर्माता, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, संख्यिकी अधिकारी सामान्य राज्यसेवा या विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभवावर आधारीत परीक्षा ३० जानेवारी रोजी मुंबई येथे विविध केंद्रावर संगणक प्रणाली आधारीत घेण्यात येणार होती. ही चाळणी परीक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून ६ संवर्गाच्या परीक्षा मुंबई येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान होणार आहे. अधिक माहिती आणि वेळापत्रक एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.