MPSC Exam: 'वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव 2 संधी द्या'; संभाजी राजेंचं उद्धव ठाकरेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 06:45 PM2021-10-29T18:45:42+5:302021-10-29T18:49:22+5:30

MPSC Exam: 2019-2020 आणि 2020-2021 या 2 वर्षात ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली आहे, अशा उमेदवारांना 2 संधी उपलब्ध करून द्याव्यात.

MPSC Exam: 'Give 2 more Opportunities to Students Over the Age'; MP Sambhaji Raje's letter to CM Uddhav Thackeray | MPSC Exam: 'वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव 2 संधी द्या'; संभाजी राजेंचं उद्धव ठाकरेंना पत्र

MPSC Exam: 'वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव 2 संधी द्या'; संभाजी राजेंचं उद्धव ठाकरेंना पत्र

Next

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने(MPSC)काही दिवसांपूर्वीच राज्यसेवेची जाहिरात आणली होती. त्यानंतर काल एमपीएससीने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात जारी केली आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव दोन संधी मिळावी अशी मागणी केली आहे. 

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. पण, कोरोना कमी झाल्याने आयोगाने मागील काही दिवसांमध्ये परीक्षांचा धडाका लावला आहे. एका पाठोपाठ एक जाहीराती आयोगाकडून जारी केल्या जात आहेत. पण, या जाहीरातींमध्ये वय निघून गेलेल्या उमेदवारांना अप्लाय करता येणार नाही. अशा उमेदवारांसाठी सरकारने दोन संधी उपलब्ध करावी, अशी मागणी संभाजी छत्रपती यांनी केली आहे. याबाबत त्यांनी एक पत्रही मुख्यमंत्र्यांना लिहीलंय.


आपल्या पत्रात संभाजी राजे म्हणतात, कोरोनामुळे मागील 2 वर्षात नोकर भरतीची जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली नाही. यामुळे, खुल्या गटासह इतर प्रवर्गातील वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना नुकत्याच MPSC द्वारे नवीन जाहिराती प्रसिद्ध होत असलेल्या परीक्षेसाठी फॉर्म भरता येत नाही. हे उमेदवार मागील 3 ते 4 वर्षांपासून सरकारी नोकरीसाठी अभ्यास करत आहे. या उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली असल्याने त्यांची परीक्षा देण्याची संधी ह्या उमेदवारांची काही चूक नसताना हिरावून घेतली जात आहे.

मोठी बातमी! आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेची घोषणा, 666 पदांसाठी जाहिरात

सरकारने मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करावा आणि यांना 2 वाढीव संधी उपलब्ध करुन द्याव्यात. यात सर्वात जास्त नुकसान हे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे झाले आहे. देशातील विविध राज्यांनी देखील उमेदवारांच्या हिताचा निर्णय घेऊन त्यांना वाढीव संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. 2019-2020 आणि 2020-2021 या 2 वर्षात ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली आहे. अशा उमेदवारांना 2 संधी उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती, असे या पत्रात म्हटले आहे.
 

Web Title: MPSC Exam: 'Give 2 more Opportunities to Students Over the Age'; MP Sambhaji Raje's letter to CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.