MPSC Exam: आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2021ची जाहिरात प्रसिद्ध, 2 जानेवारीला पूर्व परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 07:08 PM2021-10-04T19:08:35+5:302021-10-04T19:49:29+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 290 पदांसाठी ही भरती काढण्यात आली आहे.

MPSC Exam: Maharashtra Public Service Commission announces advertisement for State Service exam 2021 | MPSC Exam: आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2021ची जाहिरात प्रसिद्ध, 2 जानेवारीला पूर्व परीक्षा

MPSC Exam: आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2021ची जाहिरात प्रसिद्ध, 2 जानेवारीला पूर्व परीक्षा

googlenewsNext

पुणे: बहुप्रतिक्षीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात अखेर प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून आयोगाने एकही जाहीरात प्रसिद्ध केली नव्हती. पण, आज अखेर 2021 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगामार्फत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार आहे.

आयोगाने ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार, येत्या 2 जानेवारी 2022 एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. याबाबतची तपशीलवार जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. 5 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून अर्ज करता येणार आहे, तर अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर आहे. 

या पदांसाठी होतीय भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 12 उपजजिल्हाधिकारी, 16 पोलीस उपअधीक्षक, 16 सहकार राज्य कर आयुक्त, 15 गटविकास अधिकारी, 15 सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ, 4 उद्योग उप संचालक, 22 सहायक कामगार आयुक्त, 25 उपशिक्षणाधिकारी, 39 कक्ष अधिकारी, 4 सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, 17 सहायक गटविकास अधिकारी, 18 सहायक निबंधक सहकारी संस्था ,15 उपअधीक्षक भूमि अभिलेख,1 उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1 आणि 54 सहकारी कामगार अधिकारी पदांसाठी राज्य सेवा परीक्षा 2021 आयोजित करण्यात आली आहे.

Web Title: MPSC Exam: Maharashtra Public Service Commission announces advertisement for State Service exam 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.