MPSC Exam Postponed : "...आपल्याला पुढं जावं लागेल, मुख्यमंत्र्यांनी याकडं लक्ष द्यावं", रोहित पवारांची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 04:56 PM2021-03-11T16:56:38+5:302021-03-11T17:10:12+5:30
NCP Rohit Pawar Over MPSC Exam : 'एमपीएससी'च्या उमेदवारांनी पुण्यात रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा व 'एमपीएससी'चा तीव्र निषेध व्यक्त केला.
पुणे : येत्या 14 मार्चला होणारी एमपीएससी परीक्षा (MPSC Exam Postponed) पुढे ढकलण्याची घोषणा परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. आणि या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले. यापूर्वीही एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे आधीच निराश झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळून आली. याच रोषातून 'एमपीएससी'च्या उमेदवारांनी पुण्यात रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा व 'एमपीएससी'चा तीव्र निषेध व्यक्त केला. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे असं म्हटलं आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "यापुढं कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच #MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार आपण याकडं लक्ष द्यावं, ही विनंती!" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. मागील वर्षभरात कोरोना प्रादुर्भाव आणि मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना या निर्णयाचा चांगलाच फटका बसला.
यापुढं कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच #MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे. मुख्यमंत्री @OfficeofUT साहेब आणि @AjitPawarSpeaks दादा आपण याकडं लक्ष द्यावं, ही विनंती!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 11, 2021
"हे सरकार आमच्या आयुष्याशी खेळत आहे!"; पुण्यात 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट
पुण्यात विद्यार्थ्यांनी एमपीएससी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, बंद करा बंद करा, एमपीएससीचे गाजर दाखवणे बंद करा यासारखी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त करण्यात आला. येत्या १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण देत पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.याबाबतची अधिकृत माहिती एमपीएससीने परिपत्रकाद्वारे दिली आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील पत्रकात म्हटले आहे. मात्र पूर्ण तयारी झालेली असताना अगदी तीन दिवस अगोदर परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठाकरे सरकारच्या निर्णयाविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले, सरकारविरोधात घोषणाबाजी #MPSC#MPSCexam#ThackerayGovernment#Students#Punehttps://t.co/YqV39UVYv9
— Lokmat (@MiLOKMAT) March 11, 2021
पुण्यात MPSC चे हजारो विद्यार्थी रस्त्यावर; गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला, यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनीही विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून ठाकरे सरकारच्या निर्णयाचा विरोध केला. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, सरकारने आतापर्यंत पाच वेळा MPSC परीक्षा पुढे ढकलल्या, आता पुन्हा परीक्षा रद्द करून त्या पुढे ढकलल्या, सरकारचं धोरण चुकीचं आहे, जोपर्यंत सरकार MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करतंय, UPSC परीक्षा झाल्या, बँकिंग परीक्षा झाल्या, मग MPSC परीक्षांसाठी कोरोना होतो का? MPSC परीक्षा न घेण्यामागे ठाकरे सरकारचं राजकारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार? असा सवाल करत काँग्रेस नेत्याचा जाहीर निषेध https://t.co/3s3z0Gihup@satyajeettambe@CMOMaharashtra@OfficeofUT@IYC@INCMumbai@IYCMaha
— Lokmat (@MiLOKMAT) March 11, 2021