MPSC: ब्रेकिंग! एमपीएससी परीक्षेचा निकाल लागला; सातारच्या प्रसाद चौघुलेचा राज्यात पहिला क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 08:18 PM2020-06-19T20:18:45+5:302020-06-19T20:19:20+5:30
१३ जुलै ते १५ जुलै २०१९ मध्ये राज्यातील ४२० पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा घेतली होती
मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आज लागला आहे. यात सातारच्या प्रसाद चौघुलेने बाजी मारत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर उस्मानाबादच्या रवींद्र शेळके याने मागासवर्गात प्रथम आला आहे. मुलींमध्ये अमरावतीच्या पर्वणी पाटील यश पटकावत राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.
१३ जुलै ते १५ जुलै २०१९ मध्ये राज्यातील ४२० पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा घेतली होती, वर्षभराने हा परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला आहे. तर यासाठी पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेला ३ लाख ६० हजार ९९० पैकी ६ हजार ८२५ उमेदवार पात्र ठरले होते. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे १३२६ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले आहेत.
निकाल कसा पाहणार?
एमपीएससीच्या मुख्य वेबसाईटवर लॉग इन करा – mpsc.gov.in
त्यानंतर होमपेजमध्ये "07-2019-State Services (Main) Examination 2019- Final Result यावर क्लिक्स करा.
Control F टाइप करुन तुम्ही तुमचा रोल नंबर अथवा नाव शोधू शकता.
https://www.mpsc.gov.in/Site/Upload/Pdf/FINAL_RESULT_7-2019.pdf यावर क्लिक्स करुनही तुमचा निकाल पाहू शकता.