एमपीएससीच्या प्रलंबित परीक्षांचे वेळापत्रक अखेर जाहीर; विद्यार्थ्यांना हवी सेंटर बदलण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 05:13 AM2020-06-18T05:13:53+5:302020-06-18T06:50:00+5:30

शक्य नसल्यास होम सेंटर देण्याची समन्वय समितीची मागणी

MPSCs pending exam schedule finally announced | एमपीएससीच्या प्रलंबित परीक्षांचे वेळापत्रक अखेर जाहीर; विद्यार्थ्यांना हवी सेंटर बदलण्याची संधी

एमपीएससीच्या प्रलंबित परीक्षांचे वेळापत्रक अखेर जाहीर; विद्यार्थ्यांना हवी सेंटर बदलण्याची संधी

Next

मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल आणि मे महिन्यातील ज्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या, त्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबरला तर दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबरला आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबरला होणार आहेत.

आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर बुधवारी, १७ जून रोजी हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार या परीक्षा १३ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत होतील.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या स्थितीसंदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना व लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी फेरआढावा घेण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षांसंदर्भातील सर्व माहिती आयोगातर्फे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी परीक्षांचे अर्ज भरले तेव्हा कोरोनाचे संकट नव्हते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी त्या वेळी परीक्षांचे सेंटर ज्या जिल्ह्यात ते अभ्यासाला होते तेच नमूद केले आहे.

मात्र सध्यस्थितीत एमपीएससीच्या परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांपैकी ९० टक्के विद्यार्थी आपापल्या मूळ गावी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आता होणाºया परीक्षांसाठी सेंटर बदलण्याची एक संधी देण्यात यावी किंवा हे शक्य नसल्यास त्यांना होम सेंटर देण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने एमपीएससी समन्वय समितीने केली आहे.

असे आहे सुधारित वेळापत्रक
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० - १३ सप्टेंबर २०२०
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० - ११ आॅक्टोबर २०२०
महाराष्ट्र अभियांत्रिका सेवा पूर्व परीक्षा २०२० - १ नोव्हेंबर २०२०

Web Title: MPSCs pending exam schedule finally announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.